पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आइसक्रीम खाल्ल्यानं कोरोना होतो?

आइसक्रीम

थंड गारेगार आइसक्रीमशिवाय उन्हाळ्याला मज्जा नाही, मात्र आइस्क्रीम किंवा थंड पदार्थ खाल्ल्यावर कोरोना विषाणूचा धोका वाढेल की काय अशी भीती लोकांना वाटत आहेत. मात्र प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं ही भीती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं

आइसक्रीम खाल्ल्यानं किंवा इतर थंड पदार्थ खाल्ल्यानं कोरोना विषाणू पसरतो अशा बातम्या व्हायरल होत आहेत मात्र यात कोणतंही तत्थ्य नाही असं पत्र सूचना कार्यालयानं (पीआयबी)स्पष्ट केलं आहे. स्वच्छतेची सर्व मानकं पाळून तयार करण्यात आलेले थंड पदार्थ किंवा आइसक्रीम  खाल्ल्यावर कोरोना होतो याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, जागतिक आरोग्य संघटनेनंही असा दावा खोडून काढला आहे असं पीआयबीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कोरोना विषाणूमुळे देश लॉकडाऊन आहे. या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अफवा पसरत आहेत.  लोकांच्या मनात अनेक शंका आहेत अशावेळी लोकांच्या मनातील शंकेचं निरसन व्हावं फेक मेसेज पसरण्यापासून रोखले जावे यासाठी जागतिक आरोग्य संघटनंनं 'myth busters’  नावाचं पेजही सुरु केलं होतं. 

धक्कादायक!, फेसबुकच्या २६ कोटी युजर्सचा डेटा डार्क वेबवर लीक