पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टिकटॉक फॅनसाठी खास मोबाईल येणार : रिपोर्ट

टिकटॉक

टिकटॉक या अ‍ॅपनं भारतात अक्षरश: धुमाकूळ घातला.  टिकटॉकवर व्हिडिओ तयार करण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावले. अखेर या अ‍ॅपवर बंदीही घालण्यात आली होती. आता टिकटॉक या अ‍ॅपची पॅरेंट कंपनी  असणाऱ्या ByteDanceनं खास मोबाईल तयार करण्याचा निश्चय केला आहे. या फोनमध्ये टिकटॉक आणि कंपनीच्या इतर अ‍ॅपचा समावेश प्रामुख्यानं असणार आहे.

ByteDance कंपनी खूप आधीपासून स्मार्टफोनच्या बाजारात उतरण्याचा विचार करत असल्याचं Financial Timesनं म्हटलं आहे. ByteDance ला आपल्या अ‍ॅपची अधिकाअधिक प्रसिद्धी करायची आहे यासाठी  ByteDanceच्या अ‍ॅपनं  परिपूर्ण असलेला फोन तयार करण्याच्या विचारात कंपनी असल्याचं म्हटलं जात आहे. 

 हा फोन नेमका कसा असणार आहे याबद्दल कोणतीही माहिती अद्यापही समोर आलेली नाही. ByteDance कंपनीनं यासाठी Smartisan कंपनीशी हातमिळवणी केली असून लवकरच या फोनचं काम सुरू होणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ByteDance the parent company of viral platform TikTok is reportedly working on an own smartphone