पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG: हशा पिकवणारा 'एप्रिल फुल'

एप्रिल फुल

मार्च एंड आणि येणारा एप्रिल यामध्ये मजेचा दिवस, आनंदात घालवण्याचा दिवस असं म्हणू फार तर आपण. मला आठवतं शाळेत असताना एक एप्रिलला सकाळी झोपेतून उठविताना बाबा हमखास 'एप्रिल फुल' करायचे. कधी 'आजी आली आहे' म्हणून तर कधी 'कोण आलयं बघ तरी' असं म्हणून अंथरुणातून उठायला लावायचे आणि मग कसं 'एप्रिल फुल' बनविलं म्हणून हशा पिकायचा आणि मग सुरु व्हायचं आई-बाबांना 'एप्रिल फुल' करण्याचं सत्र. जे दिवसभर चालायचं, सुरुवात घरातून व्हायची आणि मग मित्राना 'एप्रिल फुल' करण्यात एक औरच मजा यायची. आता मात्र आयुष्य खूप फास्ट झालयं, खूप बिझी झालंय अस वाटतं कारण एक एप्रिल ला 'एप्रिल फुल' म्हणायला ही वेळ नाही आणि सुचत ही नाही, कारण व्यापच एवढा वाढलाय !!

लॉकडाऊन : बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही, अजित पवारांचा इशारा

शीघ्र कवी म्हणून ख्याती असलेले हसरत-जयपुरी यांनी लिहिलेल्या गीतांमधील मस्ती तुम्ही कधी अनुभवली आहे का? शंकर-जयकिशन यांचे संगीत आणि मो.रफी यांचा बहारदार आवाज त्या गाण्यात सुद्धा खट्याळपणा अनुभवता येतो. अशी मस्ती करण्यास आज कुणीही अडविलेले नाही पण वेळ परवानगी देत नाही. तसे पाहिले तर 'एप्रिल फुल'यास पाश्चात्य संस्कृती आहे. याचे उगमस्थान सांगणे कठीण आहे. पण १५८२ मध्ये फ्रान्सने जेव्हा ज्युलियन कॅलेंडर बदलून पोप यांचे ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. तेव्हापासून 'एप्रिल फुल' हा उत्सव सुरु झाला, अशी नोंद ट्रेन्ट परिषदेकडे सापडते. संपूर्ण जगाने वर्षाची सुरुवात एक जानेवारी अशी स्वीकारली असताना काही ठिकाणी ती एक एप्रिल अशी होते. इतिहासकारांना अशाही नोंदी सापडल्या आहेत की, ज्यामध्ये मार्च अखेरीस प्राचीन रोममध्ये 'हिलेरीया' नावाचा उत्सव साजरा केला जायचा. ज्यास पुढे जावून 'एप्रिल फूल्स डे' म्हणून साजरा केल गेलं. विषुववृत्त अथवा उत्तर गोलार्ध जिथे वसंत ऋतूचा पहिला दिवस म्हणून एक एप्रिलला पाहिले जाते. ज्यामध्ये निसर्ग मानवास कसा फसवेल याचा नेम नाही. म्हणूनच हा दिवस 'एप्रिल फूल्स डे' म्हणून देखील साजरा केला जातो.

राज्यातील १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा

साधारण १८ व्या शतकात ब्रिटनमध्ये एप्रिल फूल्स डे ची सुरुवात झाली, आणि लोक हा दिवस चक्क दोन दिवसीय परंपरेमध्ये साजरा करू लागली. ज्यामध्ये कोकिळेची शिकार करणे, 'टेली डे' ज्यात एकमेकांना शेपूट लावायचा (लोक 'किक मी' असा फलक लावून फिरायचे. ज्यांनी असा फलक लावला आहे त्यांना शेपूट लावले जायचे) खेळ खेळला जायचा आणि मजा मस्ती केली जायची. एक एप्रिलला तसे पाहिले तर अनन्य साधारण असे महत्व आहे. आता हेच पहा ना १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना याचदिवशी झाली आहे. १९७६ साली दूरदर्शनची स्थापना, याच वर्षी स्टीव्ह जॉब्सने अॅप्पल कॉम्प्युटरची स्थापना, नंतर त्यांनी कॉम्प्युटर हा शब्द काढून टाकला. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गुगल ने जी-मेल या त्यांच्या ई-मेल सेवेची घोषणा याच दिवशी केली.

VIDEO: सफाई कामगारावर नागरिकांकडून फुलांचा वर्षाव

एप्रिल फुल साजरा करण्याच्या एक ना अनेक परंपरा, चालीरिती आहेत. त्यात आपणही एखादा दिवस आनंदात घालविण्यासाठी छोटासा प्रयत्न केला तर काय हरकत आहे. 'ए जिंदगी, गले लगा ले' अस म्हणत हा दिवस एन्जॉय करावा एवढंच !!


विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची घट