पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फक्त रिट्विट करा!, अब्जाधीश ९० लाख डॉलरची संपत्ती १००० ट्विटरकरांना वाटणार

युसाका मेझावा

जपानमधील एका अब्जाधीशाने सामाजिक प्रयोग म्हणून थेट लोकांना पैसे वाटण्याची भन्नाट योजना आखली आहे. पैसे मिळाल्यामुळे लोकांच्या आनंदात वाढ होते का, याचे मोजमाप करण्यासाठी ही योजना आखल्याचे अब्जाधीशाचे म्हणणे आहे. युसाका मेझावा असे या अब्जाधीशाचे नाव आहे. जपानमधील फॅशन जगतातील दिग्गज व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

'इंटरनेट सुविधा मूलभूत अधिकारी, काश्मिरातील निर्बंधांचा फेरविचार करा'

युसाका मेझावा आपल्या संपत्तीतील ९० लाख डॉलर १००० फॉलोअर्सला वाटणार आहेत. या फॉलोअर्सची निवड रँडम पद्धतीने होणार आहे. जे फॉलोअर्स युसाका मेझावा यांचे एक जानेवारीचे ट्विट रिट्विट करतील. त्यांच्यामधून १००० फॉलोअर्सची निवड करण्यात येईल. या पैशाचा वापर कशा पद्धतीने झाला, त्यामुळे संबंधिताच्या आनंदात किती भर पडली, याचेही पुढे सर्वेक्षण करण्यात येईल.

हा अत्यंत गंभीर सामाजिक प्रयोग असल्याचे युसाका मेझावा यांनी युट्यूबवर म्हटले आहे. या प्रयोगामध्ये शिक्षण तज्ज्ञांनी आणि अर्थतज्ज्ञांनी सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले. युसाका मेझावा यांनी आतापर्यंत स्पोर्टस कार आणि विविध कलाकृतींवर खूप पैसे खर्च केले आहेत. 

जनगणना अधिकारी 'तुम्ही काय खाता' असाही प्रश्न विचारणार

आपल्याकडे पैसे आहेत आणि इतरांना पैसे वाटण्यासाठी वेळही आहे. या प्रकारच्या योजनेवरून जपानमध्ये चर्चा घडवून आणली जावी, अशी माझी इच्छा आहे, असे युसाका मेझावा यांनी म्हटले आहे.