पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून अभिनवपणे विद्यार्थ्यांना गणित शिकविण्याचा व्हिडिओ झाला व्हायरल

शिक्षिका रुबी कुमारी

बिहारमधील एका शिक्षिकेचा अभिनव पद्धतीने गणित शिकविण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा आणि अभिनेता शाहरूख खान यांनीही हा व्हिडिओ त्यांच्या सोशल हँडलवरून शेअर केला असून, संबंधित शिक्षिकेचे कौतुक केले. इतरही नेटीझन्सनी अभिनव पद्धतीने गणित शिकविण्याच्या या पद्धतीचे कौतुक केले. 

अझरुद्दिन विरोधात २० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

टिचर्स ऑफ बिहार या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ सर्वात आधी शेअर करण्यात आला. बिहार शैक्षणिक प्रकल्प परिषदेचे हे फेसबुक पेज आहे. या व्हिडिओमध्ये रुबी कुमारी नावाच्या शिक्षिका वेगळ्या पद्धतीने वर्गातील विद्यार्थ्यांना गणितातील गुणाकार शिकवतात. गुणाकार शिकविण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या हाताच्या बोटांचा वापर करतात. या माध्यमातून नऊचा पाढा त्या मुलांना सोप्या पद्धतीने सौदाहरण शिकवतात.

शाहरुख खानने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला. त्याने लिहिले आहे की, अत्यंत सोप्या पद्धतीने या व्हिडिओत गणित शिकवल्यामुळे माझ्या आयुष्यातील अनेक प्रश्न सहजपणे सुटणे शक्य झाले असे मला वाटते. 

अमित ठाकरे सक्रीय राजकारणात, मनसेच्या नेतेपदी निवड

आनंद महिंद्रा यांनीही आपल्या ट्विटमध्ये या शिक्षिकेचे कौतुक केले. मला जर माझ्या आयुष्यात अशाच शिक्षिका लाभल्या असत्या तर हा विषय आणखी पक्का झाला असता, असे त्यांनी म्हटले आहे.