पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वस्तात मस्त! १५ हजारात उपलब्ध होणारे स्मार्टफोन

बजेट स्मार्टफोन

हा स्मार्टफोनचा जमना आहे. भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या ही खूप मोठी आहे. तेव्हा मोठी बाजारपेठ पाहता अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी स्वस्तात मस्त असे स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी आणले आहेत. हे स्मार्टफोन कोणते ते पाहू.

Xiaomi Redmi Note 7S
शाओमीनं काही महिन्यांपूर्वी Xiaomi Redmi Note 7S हा फोन लाँच केला. ४८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनपैकी हा एक फोन होय. या फोनची किंमत १० हजार ९९९ पासून सुरू होते. ४ जीबी रॅम, ६.३ इंचाचा डिस्प्ले,  ४८ आणि ५ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा या फोनमध्ये देण्यात आला आहे. 

Xiaomi Redmi Note 7 Pro
काही महिन्यांपूर्वी लाँच झालेला हा फोन अल्पावधितच शाओमीचा सर्वाधिक खपाचा फोन ठरला. या फोनमध्ये ६ जीबी रॅम, ६.३ इंचाचा डिस्प्ले आहे. या फोनची किंमत  १३ हजार ९९९ पासून सुरू होते. ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा या फोनमध्ये आहे. 

Realme 3 Pro
सध्या Realme चे  फोनही  भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोनमध्ये ७१० स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सेल कॅमेरा नसला तरी २५ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. हे फोन ऑनलाइन उपलब्ध असून या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते.

Samsung Galaxy M30
शाओमी आधी  भारतीय बाजारपेठेवर  सॅमसंग हुकूमत गाजवत होती. मात्र  शाओमीच्या बजेटफोननंतर सॅमसंगकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. मात्र आता सॅमसंगनंही एम सीरिज अंतर्गत बजेट स्मार्टफोन आणले आहेत. ६ जीबी रॅम, ६.४ इंचाचा डिस्प्ले, १३ मेगापिक्सेल आणि ५ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, १६ मेगापिक्सेल सेल्फी  कॅमेरा या फोनमध्ये आहे. १४ हजार ९९० रुपयांपासून या फोनची किंमत सुरू होते. 

Asus Zenfone Max Pro M2
२०१८ मध्ये आलेल्या या फोनकडे  बजेट स्मार्टफोन म्हणून पाहण्यास काही हरकत नाही. १२ हजार  ९९९ पासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. ६ जीबी रॅम, ६.३ इंचाचा डिस्प्ले या फोनमध्ये आहे. तर १२ मेगापिक्सेल  आणि ५ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि १३ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा फोनमध्ये आहे.