पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पावसाळ्यात सर्वाधिक उपयोगी आहे ही सिलिका जेलची पुडी

सिलिका जेल

छोटे पारदर्शक दाणे असलेली ही सिलिका जेलची पुडी आपल्याला अनेकदा नव्या उत्पादनासोबत मिळते. शूज, बॅग्ज, पाण्याची बाटली खरेदी केल्यानंतर पॅकेजिंगमध्ये आपल्याला ही पुडी हमखास आढळते. मात्र तिचा उपयोग काय हे बहुतांश लोकांना माहिती नसल्यानं ते ही छोटीशी पुडी केराच्या टोपलीत फेकून देतात. मात्र सिलिका जेलची ही पुडी फेकून देऊ नका कारण पावसात ही खूपच उपयोगी पडणारी वस्तू आहे. 

Monsoon Makeup Tips : पावसाळ्यात मेकअप करा पण..

- पावसात बॅग्स, शूज, कपडे ओले झाले की ते पटकन सुकत नाही. हवेत ओलावा असल्यानं त्यांना कुबट वास येऊ लागतो. अशावेळी सिलिका जेलची ही छोटीशी पुडी नक्कीच तुमच्या मदतीला धावून येईन.
- पावसात ओले झाल्यामुळे  बॅग किंवा शूजनां येणारी दुर्गंधी या पॅकेटमुळे कमी होते. बॅगमध्ये किंवा शूजमध्ये सिलिका जेलचं पॅकेट ठेवा, सिलिका जेल ओलावा शोषून घेते. 

Style Tips : पावसाळ्यातही बिंधास्त करा स्टाईलिस्ट गेटअप

- मोबाइल भिजला असला तर त्याची बॅटरी काढून बाजूला ठेवावी. त्यानंतर डिव्हाईस सिलिका जेलच्या पॅकेटमध्ये ठेवावा. मोबाइलमधलं पाणी हे सिलिका जेल शोषून घेण्यास मदत करतं. 
- त्याचप्रमाणे पुस्तकांच्या कपाटातही पावसाळ्यात सिलिका जेलचं पॅकेट ठेवणं फायदेशीर ठरतं. 
- तुमच्या फोटो अल्बममध्येही सिलिका जेल पॅकेट् ठेवणं कधीही फायद्याचं कारण यामुळे फोटो अल्बम लवकर खराब होत नाही.