पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ आणि फायदे जाणून घ्या

ग्रीन टी

अनेकांना सकाळी चहा प्यायची सवय असते. पण आरोग्यासाठी सर्वात चांगला आणि फायदेशीर चहामधील  प्रकार म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टीमध्ये काही प्रकारचे अँटी-अँटीऑक्सिडेंट घटक असतात. ज्याला फ्लेव्होनॉइड्स म्हणतात. ग्रीन टीला तयार करताना त्याच्या पानांना अशाप्रकारे संरक्षित केली जाते जेणेकरून त्यामध्ये असलेल्या पॉलिफेनॉलचे संरक्षण होईल. 

ग्रीन टीमध्ये न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडेंट घटक असतात. ज्यामुळे चरबीचे प्रमाण कमी होते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. तसंच, ग्रीन टीमुळे शरीरात अन्नाचे कॅलरीमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण वाढते. त्यात आढळणारे विविध अँटिऑक्सिडेंट्स कर्करोगाचा धोका सुध्दा कमी करतात. साखर न टाकाता ग्रीन टी प्यायले तर ते अधिक फायदेशीर असते. 

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ?

- खाण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी ग्रीन टी प्यावी. त्यामध्ये टॅनिन असते. 

- ग्रीन टी प्यायल्यानंतर ताबडतोब खाल्ल्यामुळे पोट दुखी, मळमळ किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

- सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे टाळा. ग्रीन टीसोबत काही तरी खा.
 
- दिवसांतून तीन कपांपेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नका. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. 

- ग्रीन टी जास्त प्याल्यामुळे निद्रानाश, पोट दुखी, उलट्या, अतिसार आणि लघवी या समस्या होऊ शकतात. म्हणून झोपेच्या आधी ग्रीन टी पिऊ नका.

- ग्रीन टीमध्ये दूध आणि साखर टाकू पिऊ नये.

- सकाळ आणि संध्याकाळची वेळ ग्रीन टीसाठी योग्य आहे. हे चयापचय सक्रिय करण्यास मदत करते.