पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इन्स्टाग्रामचा वापर करण्याआधी नव्या युजर्सना उघड करावी लागणार ही माहिती...

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्रामचा नव्याने वापर करणाऱ्यांसाठी म्हणजेच इन्स्टाग्रामवर नव्याने अकाऊंट सुरू करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यापुढे इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करताना संबंधित युजरला त्याचे वय १३ वर्षे आहे हे स्पष्ट करावे लागणार आहे. ज्याचे वय १३ वर्षे आहे अशाच युजरला आता इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करता येईल. त्यापेक्षा वय कमी असेल तर इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करता येणार नाही. 

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर जैसे थे, पाहा आणि मग पुढे जा धोरणाचा अवलंब

इन्स्टाग्रामने एका ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, युजरकडून ही माहिती मागविल्यामुळे लहान मुलांना इन्स्टाग्रामपासून दूर ठेवणे शक्य होईल. यामुळे लहान मुले अधिक सुरक्षित राहतील आणि वयानुरूप इतरांना इन्स्टाग्रामचा वापर करता येईल.

पीएनबी घोटाळा: नीरव मोदी फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित

इन्स्टाग्रामवरील आपल्या वयासंबंधीची माहिती इतर युजर बघू शकणार नाहीत. पण युजरने आपल्या वयाबद्दल खोटी किंवा चुकीची माहिती दिली तर त्यावर कसे नियंत्रण ठेवणार हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. सोशल मीडियावर अनेक जण चुकीची माहिती देत असतात. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे हे एक आव्हानच आहे.