पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही फायदेशीर आहे गुलाबजल

गुलाबजलाचे फायदे (छाया सौजन्य : शटरस्टॉक)

गुलाबजल हे त्वचेच्या सौंदर्यासाठी महत्त्वपूर्ण मानलं जातं. गुलाबजलामुळे त्वचा तजेलदार आणि मऊ होते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर गुलाबजल लावल्यास चेहरा टवटवीत दिसतो. त्यामुळे फेसपॅकमध्ये आवर्जून गुलाबजल वापरलं जातं.

ना ज्यादा ना कम, लग्नसोहळ्यातले नवे फॅशन ट्रेंड्स 

चेहऱ्यावरची मुरुमं दूर होऊन  त्वचेला गुलाबजल थंडावा पोहोचवतो. रुक्ष त्वचेसाठीही गुलाबजल फायदेशीर आहे. केवळ त्वचेसाठीच नाही तर  केसांच्या आरोग्यासाठीही गुलाबजल महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे तुम्ही कोंड्याच्या समस्येनं त्रस्त असाल तर गुलाबजल फायदेशीर ठरू शकतं.  कोंड्याची समस्या दूर व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या हेअर पॅकमध्ये तुम्ही  गुलाबजल मिक्स करु शकता. किंवा नुसतं गुलाबजल केसांच्या मुळावर लावलं तरी कोंड्याच्या समस्येपासून लवकर सुटका मिळते. 

मुखविकारांपासून ते अनेक रोगांवर फायदेशीर आहे वेलची

गुलाबजल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही याचा वापर करू शकता.