पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Beauty Tips : लिंबू, ब्रोकली वापरून घरच्या घरी तयार करा फेसपॅक

फेसपॅक

आपला चेहऱ्याची त्वचा नितळ दिसावी, चेहऱ्यावरचे पुरळ, मुरूम जावेत यासाठी आपण अनेक सौंदर्यप्रसाधनं वापरतो. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. ज्याचा परिणाम आपल्या नाजूक त्वचेवर होतो. यासाठी अनेकदा ब्युटी एक्स्पर्ट नैसर्गिक घटक वापरून घरघुती  उपाय करण्याचा सल्ला देतात.  डर्मेटोलॉजिस्ट डॉ. गोएल यांनी  हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना काही घरघुती फेसपॅकची  माहिती आपल्याला दिली आहे.  जे आपल्या त्वचेसाठी  नक्कीच फायदेशीर ठरतील. 

- कोरफरड 
कोरफडीमुळे त्वचा मऊ होते. कोरफड कापून तिचा गर तुम्ही चेहऱ्याला लावू शकता, याने लवकर फरक जाणवतो. याव्यतिरिक्त १ चमचा कोरफडीच्या गरात १ टेबलस्पून लिंबाचा रस टाकावा. हे फेसपॅक २० मिनिटांनंतर धुवून टाकावं. 
- ब्रोकली फेसपॅक 
ब्रोकलीमध्ये अ आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. अतिनिल किरणांमुळे होणारं त्वचेचं नुकसान भरून काढण्यास ब्रोकली फायदेशीर आहे. एक मुठभर ब्रोकली पाण्यात उकळावी. उकडलेली ब्रोकलीची पेस्ट करून घ्यावी. यात १ टेबलस्पून मध आणि  १ टेबलस्पून दही घालावं. यात १ चमचा लिंबाचा रस घालावा. हे ग्रीन मास्क २० मिनिटे चेहऱ्यावर ठेवावं आणि नंतर धुवून टाकावं.  उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेसाठी हे मास्क फायदेशीर आहे. 

..म्हणून अक्रोड कवचासहच खरेदी करावा

- लिंबू फेसपॅक 
प्राचीन काळापासून लिंबूचा वापर नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.  लिंबू  हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. लिंबातील अनेक घटक त्वचेच्या कित्येक समस्या दूर करतात.  १ टीस्पून बेकिंग सोड्यात अर्ध्या लिंबाचा रस घालावा. या मिश्रणानं चेहऱ्यावर मसाज करावा दहा मिनिटांनंतर चेहरा थंडा पाण्यानं धुवावा हे मिश्रण स्क्रीन लाइटनिंग स्क्रब म्हणून काम करतं. याशिवाय त्याच मिश्रणात एक मोठा चमचा साखर घालावी. हे मिश्रण हाताचे कोपर, गुघडे यांचा काळवंडलेपणा दूर करतं. 
- सुरकुत्या कमी करण्यासाठी अंड फेसपॅक
वाढतं वय, तणाव यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. सुरकुत्या कमी करण्यासाठी  तुम्ही अंड्यापासून तयार केलेलं फेसपॅक वापरू शकता. 
१ अंड्याचा पांढरा भाग घेणे. यात १ टेबलस्पून दही आणि १ टेबलस्पून ब्राऊन शूगर घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण दहा मिनिटं चेहऱ्यावर ठेवावं. दहा मिनिटांनंतर चेहऱ्यावर हलका मसाज करून कोमट पाण्यानं हे मास्क धुवून टाकावं.