पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रुक्ष केसांसाठी नारळाच्या दूधाचा स्पा नक्की ट्राय करा

प्रातिनिधिक छायाचित्र

नारळाच्या झाडाला कल्पतरू म्हटलं आहे.  खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधनांपासून ते गृहपयोगी अनेक वस्तू नारळापासून तयार केल्या जातात. विशेष म्हणजे आरोग्यास फायदेशीर असणारा नारळ त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठीही खूप उपयोगी आहे. विषेशत: केसांच्या आरोग्यासाठी. थंडीत केस रुक्ष होणं, कोंडा होणं यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात, अशावेळी निरोगी केसांसाठी नारळाच्या दूधाचा स्पा तेही घरच्या घरी नक्की ट्राय करा. यासाठी ब्युटी एक्स्पर्ट शहनाझ हुसैन यांनी काही टीप्स दिल्या आहेत त्या नक्कीच उपयोगी पडलीत. 

नारळ पाण्यापासून फेसपॅक आणि त्वचा ठेवा तजेलदार

नारळाचं दूध घेऊन केसांच्या मुळांना चांगला मसाज करा. त्यानंतर केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत नारळाचं दूध चांगलं लावून घ्या. अर्धातास केस तसेच ठेवा त्यानंतर टॉवेल गरम पाण्यात बुडवून  टॉवेल घट्ट पिळून घ्या. हे टॉवेल केसांना बांधा. यामुळे केसांना वाफ मिळेल. तीन चार वेळा थोडी थोडी वाफ घ्या. त्यानंतर केस स्वच्छ धुवा. 

Beauty Tips : नारळाचं दूध केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर

तुमचे केस अधिक रुक्ष आणि डॅमेज झाले असतील तर त्यावर हा उपाय नक्कीच काम करेल. यामुळे तुमचे केस मऊ होतात. विशेष म्हणजे अधिकाअधिक रसायनं असलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा मारा झाल्यामुळे केसांना नुकसान पोहोचतं. अशावेळी केसांसाठी  हा सर्वोत्तम उपाय आहे.