पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Beauty Tips : दालचिनीनं घालवा चेहऱ्यावरचे मुरूम

दालचिनी

मसाल्यात वापरला जाणारा प्रमुख पदार्थ म्हणून दालचिनी ओळखली जाते. या मसाल्याला गोडसर अशी चवी असते त्यामुळे परदेशात अनेक गोड पदार्थात दालचिनी आवर्जून वापरली जाते. खाद्यपदार्थांबरोबरच या दालचिनीचा वापर आपण त्वचेची प्रमुख समस्या दूर करण्यासाठीही करू शकतो. चेहऱ्यावर येणाऱ्या मुरूम आणि पुरळासाठी दालचिनी फायदेशीर आहे. 

- मध आणि दालचिनी पावडर  यांचं मिश्रण करून मुरूम आलेल्या ठिकाणी लावल्यास काही दिवसांत परिणाम जाणवू लागतो. हे मिश्रण दहा पंधरा मिनिटांनी  धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरचे मुरूम कमी होण्यास मदत होते. 

ब्रेकअपच्या त्रासातून बाहेर पडायचंय?

- या व्यतिरिक्त ओटमिल, दालचिनी आणि लिंबाचा रस वापरून तुम्ही स्क्रब पॅकही तयार करू शकता. हा स्क्रब पॅक चेहऱ्याला लावल्यानंतर वीस मिनिटांनी गरम पाण्यानं चेहरा धुवून टाका. यामुळे तेलकट त्वचेपासून सुटका मिळते. चेहरा अधिक तजेलदार दिसतो.

- रुक्ष ओठांसाठीही दालचिनी फायदेशीर आहे. खोबरेल तेलात तुम्ही दालचिनीच्या दोन काड्या टाकून  तेल गरम करून घ्या. हे तेल घट्ट  होऊ द्या. अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी लिप बाम तयार करू शकता.