पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जागतिक स्तनपान सप्ताहः 'स्तनपान' नवजात बालकाच्या आरोग्यास अमृतासम

जागतिक स्तनपान आठवडा

जगातील प्रत्येक स्त्री ही 'विशेष' आहे. गर्भधारणा आणि स्तनपान करण्याची तिला दैवी देणगी मिळालेली आहे. ही अशी अमूल्य भेट स्त्रियांना मिळून देखील जगातील काही महिलांचे, युवतींचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का होते?

स्तनपान हे खरंच खूप महत्वाचे आहे का? आधुनिक युवतींना, स्त्रियांना स्तनपान करणे म्हणजे स्वतःच्या फिटनेसवर परिणाम होईल अशी भिती निर्माण का व्हावी ? याबद्दल जनजागृती करण्याची गरज का भासावी?, असे अनेक प्रश्न आज उपस्थित झाले आहेत.

लहान मुलांच्या दातांच्या साह्याने कर्करोग, ह्रदयविकारांवर उपचार शक्य

स्तनपणाचे महत्त्व पटवून देण्यासाठीच १९९२ मध्ये डब्ल्यूबीओ (वर्ल्ड ब्रेस्टफिडिंग वीक), डब्लूएचओ आणि यूनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. त्याबद्दल डॉ. मनिषा देवकर यांनी याबाबत एक तज्ज्ञ म्हणून मत व्यक्त केले आहे.

डॉ. मनिषा देवकर या 'जस्ट फॉर हर्ट्स' (जेएफएच) या वेलनेस कंपनीच्या संस्थापक आहेत. गेली 10 वर्षे ही संस्था कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व स्तरातील कामगार वर्गांसाठी आणि त्यांच्या आरोग्याबद्दल अविरतपणे काम करते. ब्रेस्ट फिडिंग म्हणजे स्तनपानाबद्दल जागरूकता निर्माण झाली पाहिजे असा कयास मनाशी बाळगून जेएफएच काम करत आहे.


कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी वेगळ्या खोल्या असतात. तिथे त्यांची पूर्ण सोय कंपनी करते. प्रत्येक वर्षी दि. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान आठवडा हा पहिल्या सहा महिन्यांच्या बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी, शारीरीक सुधारणेसाठी प्रोत्साहनपर साजरा केला जातो. १९९२ मध्ये डब्ल्यूबीओ, डब्लूएचओ आणि यूनिसेफ यांच्या संयुक्तरित्या वर्ल्ड ब्रेस्टफिडिंग वीक (डब्लूबीडब्लू) पहिल्यांदा साजरा केला गेला. स्तनपानामध्ये महत्त्वाची पोषके असतात. महत्वाची पोषकतत्वे, रोगप्रतिकारक शक्ती जसे की न्युमोनिया आणि बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी, वाढीसाठी आवश्यक घटक असतात. यावर्षी डब्ल्यूएचओ आणि यूनिसेफ यांच्या वतीने पालकांना आपल्या मुलांना स्तनपान देण्यासाठी प्रोत्साहित करणे. हा प्रकल्प पाल्य आणि पालक यांच्यामधील नातेबंध दृढ करण्यासाठी हाती घेतला आहे.

ह्रदयविकारानंतर नैराश्याचाही धोका असतो का?

अशा माता पित्यांना १८ आठवड्यांची सशुल्क रजा बाळाच्या स्तनपानासाठी मंजूर केली आहे. यामुळे पालकांची नवजात बालकाशी नाते दृढ होण्यास मदत होईल. काही मातांना घरीच काम करण्यास मुभा दिली आहे. जेणेकरून बाळाची काळजी घेतली जाईल आणि वेळोवेळी स्तनपान देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही. या कार्यक्रमामध्ये पालकांना सुरक्षितता, स्वच्छता यांचे प्रशिक्षण देऊ केले आहे. स्तनपान हे आई आणि बाळाच्या आरोग्यास सारखेच फायदेशीर आहे. स्तनपानाबद्दलाचे महत्व आणि जाणीव झाली तर ८ लाख नवजात बालकाचे आयुष्य वाचू शकेल. स्तनपान जसे नवजात बालकाला उपयोगी आहे तसेच आईलाही फायदेशीर आहे. स्तनाचा कर्करोग, गर्भाशयातील रोग, मधुमेह, हृदयरोग याचा धोका टळतो.

ज्या महिलांचे हातावर पोट आहे त्या महिलांमध्ये धीटपणा जास्त जाणवतो. म्हणजे त्या पोटासाठी आणि पोटच्या गोळ्यासाठी कोणत्याही सामाजिक मर्यादा न बाळगता आपल्या नवजात बालकाला स्तनपान करतात. ही चांगली गोष्ट आहे. अशा महिलांमुळे आपोआप जनजागृती होते. मध्यम वर्गातील महिलांना थोडासा संकोच वाटतो. पण त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहिले पाहिजे. 

वाढत्या प्रदूषणामुळे ऍलर्जी होण्याच्या प्रमाणात वाढ

सरकार पण सार्वजनिक ठिकाणी बाळाच्या स्तनपानासाठी निःशुल्क खोल्या उपलब्ध करून देते. उदा. रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाग आदी ठिकाणी. 

त्याचप्रमाणे आशिया खंडामध्ये 'ब्रेस्ट मिल्क बँक' नावाची संकल्पना भारतात १९८९ साली सुरु झाली. ज्या स्त्रियांना निसर्गतः प्रमाणापेक्षा जास्त दूध येते त्या स्त्रिया अशा मिल्क बँक मध्ये आपले दूध देऊ शकतात. यामुळे बऱ्याच बालकांचे खूप चांगल्या पद्धतीचे पालन पोषण होऊ शकते.

स्तनपानाचे फायदे

१) मातेचे दूध हे नवजात बालकाचे प्रमुख अन्न असते.
पहिल्या सहा महिन्यात मातेचे स्तनपान हे बाळाच्या आरोग्यासाठी चांगले असतेच त्यामुळे अनेक रोगांपासून त्यांचा बचाव होतो.
१)न्युमोनिया २) कर्णश्राव ३) दमा ४) त्वचा रोग ५) संसर्गजन्य रोग ६) श्वसनरोग ७) अन्ननलिकेच्या रोगापासून संरक्षण

२) स्तनपान बाळाच्या रोगामधील वेदना कमी करते.

३) स्तनपान महत्वाच्या आजारामध्ये जसे की, न्युमोनियापासून लवकर बरे होण्यास मदत करते. तसेच प्रतिजेविके देण्याचे प्रमाणही कमी करते.

४) स्तनपान बाळाचे आजारापासून संरक्षण करते, तसेच बाळाच्या मेंदूची वाढही व्यवस्थित करते.

५) स्तनपान हे बाळाच्या रक्तातील चरबीचे प्रमाण कमी करते.

६) स्तनपान हे आई आणि नवजात बाळ या दोघांसाठी हितकारक आहे.

७) ज्या माता स्तनपान देतात त्यांच्यामध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण कमी असते.

८) ज्या माता स्तनपान करतात त्यांचे आरोग्य नंतर सदृढ राहते. एका अहवालानुसार ज्या माता स्तनपान देतात त्यांच्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तातील चरबीचे प्रमाण आणि हृदयरोग यांचे प्रमाण खूप कमी होते.

९) प्रसुतीनंतर महिलांचे वजन वाढलेले असते. ज्या माता स्तनपान देतात त्यांचे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. 

वजन वाढवायचे असल्यास केळी आवर्जून खा!

याप्रकारे काळजी घेतली तर नक्कीच भारतात बाळ आणि बाळाची आई सदृढ राहतील.