पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

४० हजारांहून अधिक किंमत असलेल्या 'अ‍ॅपल वॉच'मध्ये नेमकं आहे तरी काय?

अ‍ॅपल वॉच

अ‍ॅपलच्या अनावरण सोहळ्यात आयफोन्स, आयपॅडबरोबरच लोकप्रिय अशा 'अ‍ॅपल वॉच'ची पुढची आवृत्ती लाँच करण्यात आली. कंपनीनं आपल्या अ‍ॅपल वॉच सीरिज ५ चं अनावरण केलं. खरं तर घड्याळ हे वेळ दाखवण्यासाठी वापरलं  जातं, मात्र अ‍ॅपलनं तंत्रज्ञानाच्या आविष्कारानं घड्याळाची व्याख्याच ३६० अंशात बदलली. आता घड्याळ हे फक्त वेळ दाखवणारं यंत्र न राहता ते खऱ्या अर्थानं 'स्मार्ट' यंत्र अ‍ॅपलनं घडवलं. भारतीय मुल्यानुसार ४० हजारांहून अधिक किमतीच्या या घड्याळ्यात नेमकं आहे तरी काय हे जाणून घेऊ. 

- या स्मार्ट वॉचमध्ये नेहमीच सुरू राहणारा रेटीना डिस्प्ले आहे. यापूर्वी कंपनीनं लाँच केलेल्या 'अ‍ॅपल वॉच'चा डिस्प्ले हा बंद व्हायचा. मात्र नव्या आवृत्तीमधील घडळ्यांचा डिस्प्ले हा सुरूच राहणार आहे. 
-  कंपनीनं नव्यानं लाँच केलेल्या सर्व उपकरणांचा पुनर्वापर करता येणार आहे. त्यामुळे पर्यावरणाला कमीत कमी नुकसान होईल असा प्रयत्न कंपनीनं केला असल्याचं या सोहळ्यात म्हटलं आहे.

नेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी येणार Apple TV+

- या घड्याळ्यात दिशादर्शकही देण्यात आलं आहे. याचा वापर करून अचूक दिशा ओळखता येणार आहे. तुम्ही कोणत्या दिशेला तोंड करून उभे आहात, तुम्हाला कुठे जायचं आहे याची अचूक दिशा या घड्याळात आहे. हे नवीन फीचर यात अपडेट करण्यात आलं आहे. 
- या फोनमध्ये आंतरराष्ट्रीय आपातकालीन दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. 
-  अॅपलनं 'अ‍ॅपल वॉच' बाजारात आणताना त्यात आरोग्याशी निगडीत फीचर्सचा अधिक समावेश केला आहे. यावेळी लाँच करण्यात आलेल्या घड्याळामध्येही असेच आरोग्याशी निगडीत काही फीचर्स देण्यात आले आहेत. 

आयफोन ११ सीरिज लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत एका क्लिकवर

- 'अ‍ॅपल वॉच'ची बॅटरी लाईफ ही दीर्घकाळाची टीकणारी आहे. जवळपास १८ तासांची बॅटरी लाईफ या फोनमध्ये देण्यात आली आहे. 
- या फोनची भारतातील किंमत ही ४० हजार ९०० रुपयांपासून सुरू होत आहे.