पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बहुचर्चित ‘Apple TV Plus' सेवेस सुरुवात

Apple TV Plus

नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉनसारख्या ओटीटी ( ओव्हर द टॉप) सेवेस टक्कर देण्यासाठी अ‍ॅपलनं काही महिन्यांपूर्वी ‘Apple TV Plus' सेवेची घोषणा केली होती. १ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून ही सेवा भारतासह १०० देशांत उपलब्ध झाली आहे. 

ही सेवा अ‍ॅपलच्या ग्राहकांना केवळ ९९ रुपयांच्या मासिक शुल्कावर  उपलब्ध आहे. तर नव्यानं लाँच झालेल्या आयफोन ११ सीरिज आणि आयपॅड धारकानां Apple TV+ ची सेवा वर्षभरासाठी मोफत देण्यात आली आहे.

एकाच वेळी अनेक डिव्हाइसमध्ये वापरता येणार व्हॉट्स अ‍ॅप

Apple TV+ वर प्रदर्शित होणारे चित्रपट,  कार्यक्रम हे ४० हून अधिक  भाषेत भाषांतरीत केले जाणार  आहेत.  Apple TV+ वर ग्राहकांना काही भन्नाट चित्रपट, माहितीपट पाहता येणार आहेत. पण त्याचबरोबर येत्या काळात केवळ Apple TV+ साठी विशेष कार्यक्रमांची निर्मितीही करण्यात येणार आहे. यासाठी कंपनीनं हॉलिवूडमधल्या अनेक बड्या सेलिब्रिटींसोबत करारही  केला आहे. 

'स्मार्टफोन'ला कंटाळलेल्यांसाठी नोकियाचा ११० नवा पर्याय

सध्या Apple TV+ वर  'सी', 'द मॉर्निंग शो', 'फॉर ऑल मॅनकाइंड', 'हेल्पस्टर', 'स्नूपी इन स्पेस', 'गोस्ट रायटर', 'द एलिफंट क्वीन' यासारखे कार्यक्रम, माहितीपट, चित्रपट उपलब्ध आहेत.