पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅपल नववर्षांत लाँच करणार खिशाला परवडणाऱ्या किमतीचा आयफोन?

आयफोन

अ‍ॅपल आयफोन हे सर्वसामान्य ग्राहकांच्या  खिशाला न परवडणारेच. एका ठराविक वर्गाला केंद्रीत करून आतापर्यंत  अ‍ॅपलनं आयफोन तयार केले आहेत. जगभरातील हा वर्ग मोठा आहे. मात्र आता कंपनी सामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा दरात आयफोन लाँच करण्याच्या विचारात आहे. 

३१ डिसेंबरला व्हॉट्स अ‍ॅपवर भारतीयांनी पाठवले सर्वाधिक संदेश

9to5Mac च्या वृत्तानुसार कंपनी येत्या काही महिन्यात दोन  स्वस्त आयफोन लाँच करणार आहे. हे नवे मॉडेल iPhone SE 2 किंवा  iPhone 9 या नावानं लाँच होतील. स्वस्तातील फोनच्या उत्पादनासाठी कंपनीनं दोन विविध प्रकारच्या स्क्रीन्सची मागणी  केली असल्याचंही समजत आहे. 

मजकूर हटवण्यासाठी TikTokकडे भारताची सर्वाधिकवेळा विनंती अहवालातून समोर

मार्च २०२० मध्ये कंपनी कदाचित हे स्वस्त फोन बाजारात लाँच करेल, ज्याची किंमत भारतीय मुल्याप्रमाणे साधरण २८ हजारांहून अधिक असेल असा अंदाज  अ‍ॅपल फोन अ‍ॅनॅलिस्ट मिंग ची कुनं वर्तवला आहे. तर काही रिपोर्टनुसार कंपनी २०२० मध्ये या स्वस्त फोन बरोबरच ५ नवे मॉडेलही लाँच करणार आहे.