पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅपलनं लाँच केला iPod, जाणून घ्या किंमत

आयपॉड

अ‍ॅपलनं मंगळवारी नवीन  असा iPod लाँच केला आहे. हा  iPod  १२८ जीबी आणि २५६ जीबी मेमरीमध्ये उपलब्ध आहे. नुकताच लाँच केलेला आयपॉड गेमिंगसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. यामध्ये AR-based games आणि काही शैक्षणिक अ‍ॅप्स असणार आहेत.

या अ‍ॅपमध्ये  Group FaceTime देखील असणार आहे ज्यामुळे एकावेळी अनेकांना व्हीडिओ कॉल्सदेखील करता येणार आहेत. आधीच्या आयपॉडपेक्षा नुकतेच लाँच करण्यात आलेले आयपॉड हे अधिक वेगानं  काम करणार आहेत.  हे आयपॉड  तुलनेनं वजनानं हलके असणार आहेत. आयपॉडचा वेग हा आधीच्या आयपॉडपेक्षा दुप्पट असल्यानं गेमिंगासाठी तो अधिक फायदेशीर ठरणार आहे.

 अ‍ॅपलनं आपलं सर्व लक्ष आयफोनकडे केंद्रीत केल्यानंतर  आयपॉडकडे कंपनीचं काहीसं दुर्लक्ष झाल्याचा आरोप अनेकांनी  केला होता. आता कंपनीनं आयपॉडकडेही लक्ष केंद्रीत करायला सुरूवात केली आहे. या आयपॉडची किंमत १८, ९०० रुपये, २८, ९०० आणि ३८ हजार ९०० रुपये असणार आहे.