पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅपल आयपॅडची किंमत २९, ९९० पासून सुरू

आयपॅड

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील 'स्टीव्ह जॉब्स थिएटर'मध्ये अ‍ॅपलचा अनावरण सोहळा १० सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी कंपनीनं तीन नवे आयफोन्स, अ‍ॅपल वॉच सीरिज ५  आणि अ‍ॅपल टीव्ही प्लसचं अनावरण केलं.

कंपनीनं आपल्या आयपॅडची सातवी आवृत्तीचंही अनावरण केलं. १०.२ इंचाचा डिस्प्ले असलेला अ‍ॅपलच्या आयपॅडचा पुर्नवापर करता येणार आहे. त्यामुळे कंपनीनं आयपॅड घडवताना पर्यावरणाच्या दृष्टीनेही विचार केला आहे. 

आयफोन ११ सीरिज लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत एका क्लिकवर

३२ जीबी आणि १२८ जीबीमध्ये आयपॅड उपलब्ध होणार आहे.  सिल्वर, स्पेस ग्रे, गोल्ड असे रंगांचे विविध पर्याय यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  आयपॅडमध्ये ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे तर १.२ मेगापिक्सेल एचडी फ्रंट कॅमेरा त्यात आहे. व्हिडीओ, गाणी ऐकून १० तासांची बॅटरी लाईफ आयपॅडमध्ये असेन असं कंपनीचं म्हणणं आहे. 

नेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी येणार Apple TV+

केवळ वायफायवर चालणाऱ्या मॉडेलची किंमती  ही २९,९०० रुपयांपासून सुरू आहे तर वायफाय सेल्यूलर मॉडेल्सची किंमत ही ४० हजार ९०० पासून सुरू आहे. 

४० हजारांहून अधिक किंमत असलेल्या 'अ‍ॅपल वॉच'मध्ये नेमकं आहे तरी काय?