पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी येणार Apple TV+

अ‍ॅपल टीव्ही प्लस

अ‍ॅपलच्या अनावरण सोहळ्यात कंपनीनं आपल्या बहुचर्चित अशा Apple TV+ चीही घोषणा केली. अ‍ॅपलची ही  स्ट्रिमिंग सेवा  नेटफ्लिक्ससारख्या मोठ्या ओटीटी ( ओव्हर द टॉप) सेवेस टक्कर देणार हे नक्की. ही सेवा अ‍ॅपलच्या ग्राहकांना केवळ ९९ रुपयांच्या मासिक शुल्कावर  उपलब्ध होणार आहे. १ नोव्हेंबर २०१९ पासून Apple TV+ च्या सेवेस सुरूवात होत आहे. 

आयफोन ११ सीरिज लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत एका क्लिकवर

नव्यानं लाँच झालेल्या आयफोन ११ सीरिज आणि आयपॅड धारकानां Apple TV+ ची सेवा वर्षभरासाठी मोफत देण्यात आली आहे.  Apple TV+ वर ग्राहकांना काही भन्नाट चित्रपट, माहितीपट पाहता येणार आहेत. पण त्याचबरोबर येत्या काळात केवळ Apple TV+ साठी विशेष कार्यक्रमांची निर्मितीही करण्यात येणार आहे. यासाठी कंपनीनं हॉलिवूडमधल्या अनेक बड्या सेलिब्रिटींसोबत करारही  केला आहे. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या Apple TV+ मध्ये अ‍ॅपल धारकारांना चित्रपट, माहितपटांसोबतच काही वेगळे कार्यक्रमही पाहता येणार आहेत.

हुआवै कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन पुढच्या महिन्यात होणार लाँच

 जवळपास १०० हून अधिक देशातील अ‍ॅपल धारकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.  जुन्या अ‍ॅपल धारकांना सुरूवातीला एका आठवड्यासाठी ही सेवा मोफत देण्यात येणार आहे.