पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Apple iPhone X च्या किमतीत मोठी सूट जाणून घ्या किंमत

आयफोन X

अॅपल आयफोन X च्या किमतीत मोठी सवलत ग्राहकांना मिळणार आहे. अॅमेझॉनच्या समर सेलमध्ये ग्राहकांना मूळ किमतीपेक्षाही कमी किमतीत  Apple iPhone X खरेदी करता येणार आहे. जवळपास २१ हजारांची घट मूळ किमतीत मिळणार आहे.

अॅपलनं आपल्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त अॅपल आयफोन X बाजारात आणला होता.  अद्यावत प्रणाली, फेस आयडी यासारखे फीचर  या फोनमध्ये होते. या फोननं अनेकांना भुरळ पाडली मात्र या फोनची किंमत अनेकांच्या खिशाला न परवडणारीच होती. आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फोनच्या किमतीत भरघोस सवलत अॅमेझॉननं दिली आहे. या फोनची मूळ किंमत ९१, ९९० आहे मात्र अॅमेझॉन समर सेल अंतर्गत हा फोन केवळ ६९, ९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. २० हजारांहून अधिकची सूट या फोनमध्ये देण्यात आली  आहे.  २५६ जीबी व्हेरिएंटची मूळ किंमत ही १ लाख ६ हजार ९०० आहे  समर सेल अंतर्गत हे व्हेरिएंट १ लाख १ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे.

आयफोन  6S च्या किमतीतही सूट देण्यात आली आहे. ३२ जीबीचं व्हेरिएंट २९ हजारांऐवजी २७, ९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे.