पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतात अ‍ॅपलकडून या आयफोनच्या किमतीत वाढ

आयफोनच्या किमतीत वाढ

भारतात अँड्राईड वापरकर्त्यांबरोबरच अ‍ॅपल धारकांचीही संख्या अधिक आहे.  गेल्याचवर्षी  अ‍ॅपलनं आपले नवे फोन लाँच केले. कंपनीनं लाँच केलेल्या सर्वांत महागड्या आयफोनपैकी ते एक होते. अर्थसंकल्पानंतर यातल्या नव्यानं लाँच झालेल्या  iPhone 11 Pro Max, iPhone 11 Pro आणि iPhone 8 च्या किमतीत कंपनीनं वाढ केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात महागड्या फोनच्या आयात करातील रचनेत बदल झाल्यानंतर कंपनीनं या तीन आयफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. 

कोरोनाचा आता युरोपमध्ये वेगाने फैलाव, इटलीमध्ये चिंतेची स्थिती

आयफोन पूर्वीची किंमत आणि आताची किंमत 
 - iPhone 11 Pro ६४GB आता १, ०१, २०० रुपयांना उपलब्ध होणार आहे  यापूर्वी त्याची किंमत ९९,००० रुपये होते. 
- २५६ GB मॉडेल पूर्वी १, १३, ९०० रुपयांना उपलब्ध होता आता  किमतीत वाढ झाल्यानं तो १, १५, २०० रुपयांना उपलब्ध होणार आहे.
- iPhone 11 Pro Max ६४GB  आणि २५६ GB अनुक्रमे १, ११, २०० रुपये  आणि  १, ४३, २०० रुपयांना उपलब्ध  होणर आहे. हे दोन्ही फोन पूर्वी २ हजार रुपयांनी स्वस्त होते. 
- iPhone 8 च्या किमतीत  कंपनीकडून साधरण ७०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

मोदी-शहांसह उद्धव ठाकेरेंचंही चांगल व्यंगचित्र काढता येईल: राज ठाकरे