पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयफोन ११ ई- कॉमर्ससाईटवर विक्रीपूर्वीच ‘out-of-stock’

आयफोन ११

अ‍ॅपलनं आपल्या बहुप्रतीक्षित अशा आयफोन ११ सीरिजचं अनावरण १० सप्टेंबररोजी केलं. हे फोन्स २७ सप्टेंबरपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. तत्पूर्वी अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई- कॉमर्ससाइटवर या फोन्सची प्री बुकिंग ग्राहकांना करता येणार आहे. मात्र विक्री सुरु व्हायला अजून सुरूवातही झाली नाही तोच हे फोन ‘out-of-stock’ दाखवत आहेत. 

केवळ आयफोन ११ च नाही तर आयफोन ११ प्रो, आयफोन ११ प्रो मॅक्स सारखे तुलनेनं अधिक महाग फोन्सदेखील ‘out-of-stock’ दाखवत आहेत. २० सप्टेंबररोजी कंपनीनं  प्री बुकिंगला सुरूवात केली. मात्र आता भारतातल्या दोन लोकप्रिय ई- कॉमर्ससाईटवर विक्रीपूर्वीच तो उपलब्ध  नसल्याचं दाखवत आहे. 

नेटफ्लिक्सला टक्कर देण्यासाठी येणार Apple TV+

आयफोन ११ सीरिजचे फीचर्स 
- iPhone 11 हा ६४ GB, १२८ GB आणि २५६ GB अशा तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध असेन. iPhone 11 ची किंमत ही ६४ हजार ९०० पासून सुरू होत आहे. पर्पल, ग्रीन, यलो, ब्लॅक, व्हॉइट आणि प्रोडक्ट रेड अशा सहा नव्या रंगात हा फोन बाजारात उपलब्ध असेन. iPhone 11 मध्ये ६.१ इंचाचा एलसीडी डिस्प्ले असणार आहे. उत्तम आवाजासाठी डॉल्बी अॅटमॉस सपोर्टही देण्यात आला आहे. 

- iPhone 11 Pro व iPhone 11 Pro Max हे देखील ६४ GB, १२८ GB आणि २५६ GB अशा तीन मॉडेल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील. यात ग्राहकांना मिडनाइट ग्रीन, स्पेस ग्रे, सिल्व्हर आणि गोल्ड असे रंगाचे पर्याय निवडता येतील. iPhone 11 Pro ची किंमत ही साधरण ९९,९०० च्या घरात आहे तर iPhone 11 Pro Max ची किंमत १ लाखांहून अधिक आहे. iPhone 11 Pro मध्ये ५.८ इंचाचा ओएलइडी डिस्प्ले देण्यात आला आहे तर iPhone 11 Pro Max मध्ये ६.५ इंचाचा ओएलइडी डिस्प्ले असणार आहे.  या दोन्ही फोन्समध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात वाइड अँगल आणि अल्ट्रा वाइड अँगल असे तीन सेन्सॉर असणार आहेत.

व्हॉट्स अ‍ॅप स्टेटसमध्ये झालेला हा बदल माहितीये?