पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅपल आयफोन ११, आयफोन ११ प्रो आणि प्रो मॅक्सच्या किमती लीक

आयफोनच्या किमती लीक

अ‍ॅपल कंपनी आपल्या बहुप्रतीक्षित आयफोन्सचं आज अनावरण करणार आहे. भारतीय वेळेनुसार १० सप्टेंबरला रात्री १०.३० वाजल्यापासून या फोन्सचा अनावरण सोहळा सुरू होणार आहे. अनावरण सोहळ्यास काही तास उरले असताना या बहुप्रतीक्षित iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max च्या किमती सोशल मीडियावर लीक झाल्या आहेत.

iPhone 11 किंमत 
सोशल मीडियावर लीक झालेल्या माहितीनुसार  iPhone 11ची किंमत ही ५३ हजारांपासून सुरू होत आहे.
iPhone 11 ६४ GB मॉडेल - अंदाजे ५३ हजार 
iPhone 11 १२८ GB मॉडेल - अंदाजे ५७ हजारांहून अधिक
iPhone 11 २५६ GB मॉडेल - अंदाजे ६४ हजार ४०० रुपये

असा पाहता येणार अ‍ॅपलच्या नव्या आयफोनचा अनावरण सोहळा

iPhone 11 Pro किंमत 
सोशल मीडियावर लीक झालेल्या माहितीनुसार या iPhone 11 Pro च्या विविध वेरिएंटची किंमत ही ७२ हजारांपासून सुरू आहे. 
iPhone 11 Pro १२८ GB - ७२ हजार
iPhone 11 Pro २५६ GB - ७९ हजार
iPhone 11 Pro ५१२ GB - ८६ हजार

अ‍ॅपलच्या पोतडीतून काय काय निघणार?

iPhone 11 Pro Max 
iPhone 11 Pro Max १२८ GB - ७९ हजार
iPhone 11 Pro Max २५६ GB - ८६ हजार
iPhone 11 Pro Max ५१२ GB - ९३ हजार 
iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये अद्यावत प्रणालीनंयुक्त असा कॅमेरा असणार आहे. या दोन्ही फोन्समध्ये ओएलईडी स्क्रीन्स असल्यानं याची किंमत ही जास्त असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.