पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयफोन ११ सीरिज लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत एका क्लिकवर

तीन नवे आयफोन लाँच

अ‍ॅपलनं आपल्या बहुप्रतीक्षित अशा आयफोन ११ सीरिजचं अनावरण केलं आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनी नवीन फोन,  गॅझेटचं अनावरण करते. १० सप्टेंबर रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील 'स्टीव्ह जॉब्स थिएटर'मध्ये अ‍ॅपलचा अनावरण सोहळा पार पडला. या अनावरण सोहळ्यात तीन नवे आयफोन्स, अ‍ॅपल वॉच सीरिज ५, आयपॅड आणि अ‍ॅपल टीव्ही प्लसचं अनावरण करण्यात आलं. 

अ‍ॅपलनं  iPhone 11,  iPhone 11 Pro व iPhone 11 Pro Max हे तीन बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित आयफोन लाँच केले. हे तिन्ही फोन कंपनीनं गेल्यावर्षी लाँच केलेल्या iPhone XR, iPhone XS आणि iPhone XS Max ची पुढची आवृत्ती आहे. या फोनमध्ये iOS 13 ही नवी ऑपरेटिंग सिस्टम आहे त्यामुळे हा फोन तुलनेनं जलद गतीनं काम करणार आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये काही महत्त्वाचे फीचर्सही असणार आहेत. 

ऑटोमोबाईल क्षेत्रातील स्थिती चिंताजनक, विक्रीत १९९८ नंतरची मोठी घसरण

iPhone 11 हा ६४ GB, १२८ GB आणि २५६ GB अशा तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध असेन. iPhone 11 ची किंमत ही ६४ हजार ९०० पासून सुरू होत आहे. पर्पल, ग्रीन, यलो, ब्लॅक, व्हॉइट आणि प्रोडक्ट रेड अशा सहा नव्या रंगात हा फोन बाजारात उपलब्ध असेन. iPhone 11 मध्ये ६.१ इंचाचा एलसीडी डिस्प्ले असणार आहे. उत्तम आवाजासाठी डॉल्बी अॅटमॉस सपोर्टही देण्यात आला आहे. 

नव्यानं लाँच झालेल्या तिन्ही आयफोन्सचं वैशिष्ट्य म्हणजे यात १२ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. वाइड अॅगल फोटोसाठी वेगळा सेन्सॉर फोनमध्ये आहे. रात्रीच्या अंधारात उत्तम फोटो यावेत यासाठी  'नाईट मोड' फीचरमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली आहे. या फोनमधून उत्तम प्रतीचे 4K व्हिडीओही चित्रीत करण्यात येणार आहे.  

वाहन उद्योगातील मंदीला ओला-उबेर कारणीभूत, सीतारामन यांचा अजब दावा

iPhone 11 Pro व iPhone 11 Pro Max हे देखील ६४ GB, १२८ GB आणि २५६ GB अशा तीन मॉडेल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील. यात ग्राहकांना मिडनाइट ग्रीन, स्पेस ग्रे, सिल्व्हर आणि गोल्ड असे रंगाचे पर्याय निवडता येतील. iPhone 11 Pro ची किंमत ही साधरण ९९,९०० च्या घरात आहे तर iPhone 11 Pro Max ची किंमत १ लाखांहून अधिक आहे. iPhone 11 Pro मध्ये ५.८ इंचाचा ओएलइडी डिस्प्ले देण्यात आला आहे तर iPhone 11 Pro Max मध्ये ६.५ इंचाचा ओएलइडी डिस्प्ले असणार आहे.  या दोन्ही फोन्समध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात वाइड अँगल आणि अल्ट्रा वाइड अँगल असे तीन सेन्सॉर असणार आहेत.

एकंदरच उत्तम फोन आणि अधिक वेगवान प्रणाली या दोन गोष्टीवर अ‍ॅपलनं आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. नव्यानं लाँच झालेल्या फोन्सची बॅटरी लाइफ ही आधीच्या फोन्सपेक्षा अधिक असणार आहे असा दावा कंपनीनं केला आहे. २७ सप्टेंबरपासून हे तिन्ही आयफोन विक्रीसाठी उपलब्ध असतील. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Apple iPhone 11 iPhone 11 Pro iPhone 11 Pro Max launched Here are full specifications features and price