पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅपलचा iPhone ११ येतोय, फोटो आणि फीचर लीक

आयफोन

येत्या काही महिन्यात अ‍ॅपल कंपनीनं आपला नवा फोन लाँच करणार आहे. हा फोन म्हणजेच आयफोन ११ होय. साधरण सप्टेंबरमध्ये कंपनी हा फोन लाँच करणार आहे. मात्र लाँचिंगपूर्वी या फोनचा एक फोटो आणि फीचर सोशल मीडियावर लीक झाला आहे. 

ट्विटरवर ७५ हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या कन्सेप्ट डिझायनर बेननं आयफोन ११ चा फोटो शेअर केला आहे. अ‍ॅपलच्या नेहमीच्या कॅमेरा सेटअपपेक्षा खूपच वेगळा कॅमेरा सेटअप नव्या फोनमध्ये दिसत आहे. 

सोशल मीडियावर लीक झालेल्या माहितीनुसार कंपनी आता ट्रिपल रिअर कॅमेरा आणण्याचा विचारात आहे. यापूर्वी लाँच झालेल्या  अनेक अँड्राइडफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहेता मात्र आयफोन ११ मध्ये हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.  
कंपनी  २०१९  या वर्षांत तीन फोन लाँच करणार आहे, मात्र या फोनची स्क्रीन साइजही गतवर्षी लाँच करण्यात आलेल्या फोनच्या स्क्रीन साइजइतकीच असणार आहे.