पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाढत्या प्रदूषणामुळे ऍलर्जी होण्याच्या प्रमाणात वाढ

ऍलर्जी

सातत्याने बदलते हवामान आणि वाढते प्रदूषण या दोन्हीचा मानवी शरीरावर परिणाम झाला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता ऍलर्जीचे प्रमाण वाढले असून, प्रत्येकालाच ऍलर्जीचा सामना करावा लागतो आहे. त्यातच उन्हाळा वाढू लागला की ऍलर्जीचे प्रमाणही वाढू लागते. त्यामुळे ऋतूंचाही याच्याशी संबंध असतो, असे आढळून येते.

सीएनएन या आंतरराष्ट्रीय वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अल्प उत्पन्न गटातील लोकांना आणि लहान मुलांना ऍलर्जीचा सर्वाधिक सामना करावा लागतो. प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी पर्याप्त साधने या कुटुंबातील व्यक्तींकडे नसल्यामुळे त्यांना अस्थमा, फुफ्फुसाशी संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागतो. बाहेरील तापमान वाढू लागल्यावरही ऍलर्जी होण्याचे प्रमाण वाढते. काही वनस्पतींमधूनही या काळात अपायकारक घटकांचे उत्सर्जन होत असल्यामुळे प्रदूषणात वाढच होते. त्याचा परिणाम मानवी शरीरावर होतो.

सीएनएनचे एँजल वॉलड्रन म्हणाले, आपण अनेकांकडून असे ऐकतो की पूर्वी ऍलर्जीचा इतका सामना करावा लागत नव्हता. ऍलर्जी होतही नव्हती. पण आता सर्रास सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ऍलर्जीचा सामना करावाच लागतो. तापमानवाढीमुळे झाडे आणि वनस्पतींमधून उत्सर्जन होणाऱ्या अपायकारक घटकांमुळेही ऍलर्जी होऊ शकते.

जागतिक तापमानवाढीचे प्रमाण पुढील काळातही असेच सुरू राहिले, तर येत्या शतकाच्या अखेरपर्यंत जगाच्या अनेक भागांमध्ये उन्हाळ्याचा कालावधी सुमारे एक महिन्याने वाढलेला जाणवेल. ज्या भागांमध्ये अद्याप प्रदूषण नाही. तिथेही इतर देशांमुळे प्रदूषणाच्या समस्या तयार होतील, असे त्यांनी म्हटले आहे.