पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एअरटेलची वायफाय व्हॉईस कॉल सेवा भारतात सुरू, वाचा सेवा कशी सुरू करायची

एअरटेलची वायफाय कॉल सुविधा सुरू

वायफायवर आधारित व्हॉईस कॉल सुविधा भारती एअरटेलकडून मंगळवारी भारतात सुरु करण्यात आली. सध्या केवळ दिल्ली-एनसीआर परिसरातील ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. पण लवकरच देशातील सर्व शहरांतील ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय एअरटेल वायफाय कॉल सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

काश्मीरमधील स्थिती सामान्य पण काँग्रेसची..., अमित शहांचे प्रत्युत्तर

एअरटेल वायफाय कॉल सुविधा सध्या केवळ निवडक हँडसेटवरच उपलब्ध आहे. कोणत्या हँडसेटवर ही सुविधा उपलब्ध आहे. हे पाहण्यासाठी ग्राहकांना एअरटेलच्या वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ऍपलच्या निवडक मोबाईलवर ज्यामध्ये आयफोन ६, आयफोन एसई आणि त्यावरील हँडसेटवर ही सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर शिओमी पोको एफ१, शिओमी रेडमी के २०, शिओमी रेडमी के२० प्रो, सॅमसंग जे ६, गॅलक्सी एम ३०, गॅलक्सी ए १० या हँडसेटवर ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

'शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले हे योग्य नाही'

जर तुमच्याकडे या सुविधासाठी पूरक हँडसेट असेल, तर तुम्हाला ही सेवा सुरू करण्यासाठी सेटिंग्जमध्ये पुढील बदल करावे लागतील. 

तुमच्या मोबाईलमधील ऑपरेटिंग सिस्टिम अद्ययावत करून घ्या.

तुमच्या स्मार्टफोनमधील सेटिंग्ज उघडा आणि वायफाय कॉल इनेबल करा.

तुमच्या हँडसेटमधील VoLTE सुरू आहे याची खात्री करा.

एक्स्ट्रिम फायबर होम ब्रॉडबँड सेवेसोबतच एअरटेलची वायफाय कॉल सुविधा उपलब्ध आहे. लवकरच सर्व प्रकारच्या ब्रॉडबँडवर ही सुविधा उपलब्ध होईल, असे कंपनीने म्हटले आहे.