पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एअरटेलनं ग्राहकांसाठी कोरोनाची लक्षणे तपासण्यासाठी आणलं symptom checker tool

संग्रहित छायाचित्र

एअरटेलनं आपल्या  ग्राहकांकरता  कोरोनाची लक्षणे तपासण्यासाठी खास ट्रॅकर टुल्स तयार केलं आहे. Apollo 247 असं या टुल्सचं नाव आहे. एअरटेलनं अपोलो हॉस्पिटलसोबत भागीदारी करत हे  टुल तयार केलं आहे.  जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य मंत्रालयानं घालून दिलेल्या नियमावलीचा वापर करून हे टुल तयार करण्यात आलं आहे. 
एअरटेलचे ग्राहक Airtel Thanks App द्वारे  Apollo 247  हे टुल वापरू शकतात. कंपनीनं यासाठी एक वेबसाइटही तयार केली आहे. या वेबसाइट किंवा टुल्सच्या मदतीनं तुम्ही कोरोनाची लक्षणे तुमच्यामध्ये आहेत की नाही हे ओळखू शकता. 

कोरोना संक्रमणाचा असाही परिणाम, व्हॉट्सऍपच्या वापरात सर्वाधिक वाढ

कसा करायचा वापर
 हे टुल उघडल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येतील.  यामध्ये तुम्हाला  वय,  लिंग, शरीराचे तापमान यासंबधी काही प्रश्न विचारण्यात येईल. त्याचप्रमाणे  तुम्हाला कफ, घसा दुखणं किंवा थकवा जाणवत आहे का असेही प्रश्न विचारण्यात येतात. या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला त्यात भरायची आहे. 

याव्यतिरिक्त मधूमेह, हृदयविकार, रक्तदाब अशाही काही तब्येतीच्या समस्या आहेत का असाही प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाची उत्तरेही तुम्हाला द्यायची आहेत. तसेच तुम्ही गेल्या काही दिवसांत विदेशातून प्रवास करून आलात का याचीही माहिती तुम्हाला देणं गरजेचं असणार आहे.

लॉकडाऊनचा परिणाम, देशातील १०२ शहरांतील हवेची गुणवत्ता सुधारली

ही सगळी माहिती भरुन झाल्यानंतर या माहितीची गोळाबेरीज करुन तुमच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आहेत की नाही किंवा कोरोनाची बाधा होण्याची शक्यता  आहे की नाही याचा अंदाज वर्तवला जातो.