एअरटेलनं आपल्या V-Fiber ब्रॉडबँड युजर्सनां एक खास सवलत देऊ केली आहे. एअरटेलच्या ‘Airtel Thanks’ प्रोग्रॅम अंतर्गत ब्रॉडबँड युजर्सनां विशेष सवलत देण्यात आल्या आहेत. एअरटेलनं आपल्या ब्रॉडबँड युजर्सनां नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, झी ५ सारख्या अॅपचं ठराविक काळासाठी मोफत सबस्क्रीप्शन दिलं आहे. १ हजार ९९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या नेट प्लॅनवर या खास सवलती देण्यात आल्या आहेत. तर जाणून घेऊयात एअरटेलनं आपल्या ग्राहकांना दिलेल्या सवलती.
१,०९९ रुपये प्लान : यावर ग्राहकांना ३०० जीबी डेटा महिनाभरासाठी मिळणार आहे. इंटरनेट स्पीड हा १००Mbps असणार आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांना ५०० जीबी बोनस डेटाही मिळणार आहे. यात तीन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स, १ वर्षांसाठी अॅमेझॉन प्राईम मोफत मिळणार आहे. त्याचप्रमआणे झी५, एअर टीव्ही प्रिमियमचा लाभ घेता येणार आहे.
१, ५९९ रुपये प्लान : यामध्ये ग्राहकांना ६०० जीबी डेटा मिळणार आहे. इंटरनेट स्पीड हा ३००Mbps असणार आहे. १००० जीबी बोनस डेटाही मिळणार आहे. यात तीन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स, १ वर्षांसाठी अॅमेझॉन प्राईम मोफत मिळणार आहे. त्याचप्रमआणे झी५, एअर टीव्ही प्रिमियमचा लाभ घेता येणार आहे.
१, ९९९ रुपये प्लान : अनलिमिटेड डेटा ग्राहकांना मिळणार आहे. इंटरनेट स्पीड हा १००Mbps असणार आहे. यात तीन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स, १ वर्षांसाठी अॅमेझॉन प्राईम मोफत मिळणार आहे. त्याचप्रमआणे झी५, एअर टीव्ही प्रिमियमचा लाभ घेता येणार आहे.