पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वनप्लसच्या फोननं घेतला पेट, युजर्सची तक्रार

वनप्लस

सर्वोत्तम फीचर्ससाठी गेल्या कित्येक वर्षांपासून ग्राहकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या वनप्लसच्या वनप्लस वन फोननं पेट घेतला असल्याची तक्रार युजरनं केली आहे. फोनचं चार्जिंग सुरू नव्हतं किंवा हा फोन चार्जरला प्लगही केला नव्हता तरीही फोननं पेट घेतला अशी तक्रार ग्राहक राहुल हिमालियन यानं केली आहे. 

युजरनं सोशल मीडियावर पेट घेतलेल्या फोनचा फोटो शेअर केला आहे.  ३ जुलैला ही घटना घडली. फोननं अचानक पेट घेतला, धूर संपूर्ण रुममध्ये पसरला. पाणी ओतून आग विझवली. जर माझं लक्ष नसतं तर फोनचा स्फोट होऊन गंभीर दुखापत मला झाली असती असं युझरनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

 मोबाईलनं पेट घेतला तेव्हा फोन चार्जिंगला नव्हता. घरातला एसी सुरू होता आणि खोलीतलं तापमान हे जवळपास १९ अंश सेल्शिअस होतं, ही बाबही राहुलनं निदर्शनास आणून दिली. 

पेट घेतलेलं मॉडेल हे पाच वर्षे जुनं आहे.  राहुलच्या तक्रारीची दखल वनप्लसनं त्वरीत घेतली आहे. वनप्लसची टीम युजरच्या घरी पोहोचली आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी आमच्यातर्फे सुरू आहे आणि अशा प्रकारच्या तक्रारी आम्ही नेहमीच गांभीर्यानं घेतो असंही वनप्लसनं म्हटलं आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:A OnePlus phone caught fire earlier this week despite being in switched off and unplugged mode