पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं

कोरोनाची नवीन लक्षणं

कोरोना विषाणूची लागण झाल्यावर सर्दी, ताप, खोकला, थकवा, श्वास घ्यायला त्रास होणे या सारखी लक्षणं असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र यात मोठे आव्हान म्हणजे अनेक लोकांना अशी लक्षणं दिसून येतच नाही. अनेकांना कोरोना झालाय पण त्यांना हा त्रास होत नाही. अशामध्ये अमेरिकेत कोरोनाची आणखी सहा नवीन लक्षणं दिसून आली आहेत. 

मुंबईतल्या या दोन वॉर्डमध्ये १ हजारांहून जास्त कोरोनाग्रस्त

कोरोना विषाणूची नवीन लक्षणं - 

अमेरिकेतील सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य संस्था असलेल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनने (सीडीसी) कोरोनाची ही सहा नवीन लक्षणं शोधून काढली आहेत. सीडीसीने सांगितले की, सर्दी, थंडीमुळे शरीराचा थरकाप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि चव किंवा गंध ओळखण्याची शक्ती कमी होणे ही कोरोना विषाणूच्या संसर्गाची नवीन लक्षणे देखील असू शकतात. या आरोग्य संघटनेने हे देखील स्पष्ट केले आहे की नाकातून सतत पाणी येणे हे एखाद्या संक्रमित व्यक्तीमध्ये क्वचितच आढळते आणि शिंका येणे हे कोरोना विषाणूचे लक्षण नाही. 

मुंबईत लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ला, चौघांना अटक

आधी कोरोनाची होती ही लक्षणं - 

सीडीसीने आधी सांगितले होते की, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये ताप, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणं आढळून येत होती. चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील २९ लाख ७१ हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

म्युच्युअल फंड संकटः RBI कडून ५० हजार कोटींची तरतूद