पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हे पाच पदार्थ त्वचेला देतील नैसर्गिक उजळपणा

हे पाच पदार्थ त्वचेला देतील नैसर्गिक उजळपणा

अनेकदा महिला उजळ त्वचेसाठी विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधनं  वापरतात. मात्र सौंदर्यप्रसाधनांपेक्षाही जर तुमचा आहार योग्य आणि पौष्टिक असेल तर साहजिकच त्वचेचं सौंदर्यही खुलून येईल. भरपूर पाणी आणि योग्य आहार तुमच्या निस्तेज त्वचेसाठी संजीवनीपेक्षा कमी नाही. पण याच आहारात खालील पाच पदार्थांचा समावेश केला तर तुमच्या त्वचेचं सौंदर्य हे अधिक खुलेल हे नक्की 

हे नैसर्गिक उपाय दूर करतील कोंड्याची समस्या

आवळा 
भरपूर प्रमाणात असलेल्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे त्वचेच्या अनेक आजारांवर आवळा हा चांगला पर्याय आहे. 
दही 
रोजच्या आहारात एक किंवा दोन चमचे दह्याचाही समावेश करा. दही हे तुमच्या त्वचेचं  आरोग्य सुधारण्यास मदत करते.
संत्री 
या मोसमात संत्री भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. क जीवनसत्त्वाचा मोठा स्त्रोत संत्र्यांमध्ये आहे. संत्र्याच्या सेवनानं त्वचेवरच्या सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. 
मासे 
माशांमध्ये ओमेगा ३  फॅटी अॅसिड अधिक असते. यामुळे त्वचेचा रुक्षपणा निघून जातो. त्वचेला आवश्यक ते पोषण तत्व यातून मिळतं.
अळशी, अक्रोड 
जर तुम्ही शाकाहारी असाल तर माशांऐवजी अळशीच्या बीया, अक्रोडचा आहारात समावेश करा. 

 

व्हिगन सौंदर्यप्रसाधनं त्वचेसाठी का गरजेची?