पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाओमीचा १०८ मेगापिक्सेल असलेला महागडा फोन लाँच

शाओमी एमआय नोट १०

शाओमी कंपनीनं  नुकताच स्पेनमधील  इव्हेंटमध्ये  आपला १०८ मेगापिक्सेल असलेला एमआय नोट १० फोन लाँच केला आहे. चीनमध्ये ५ नोव्हेंबरला लाँच झालेल्या एमआय सीसी९ प्रोचं हे ग्लोबल व्हेरिएंट आहे. हा फोन एमआयच्या महागड्या फोनपैकी एक आहे. 

Xiaomi Mi Note 10 किंमत 
- स्पेनमध्ये हा फोन १५ नोव्हेंबरपासून विक्रीस उपलब्ध होणार आहे. या फोनची स्पेनमधली किंमत जवळपास ४३,००० रुपये आहे. 
- तर Xiaomi Mi Note 10 Pro च्या ८ जीबी रॅम असलेल्या व्हेरिएंटची किंमत ५१,००० रुपये आहे. हा फोन ऑरोरा ग्रीन, ग्लेशिअर व्हाइट आणि मिडनाइट ब्लॅक अशा तीन रंगात उपलब्ध होणार आहे. 

अनावश्यक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचे नाही? मग हे करा....

Xiaomi Mi Note 10 चे फीचर 
- शाओमीचा Xiaomi Mi Note 10 हा १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेला पहिला पेंटा कॅमेरा फोन ठरला आहे. 
- या फोनमध्ये पाच रिअर कॅमरा आहेत. ज्यात १०८ मेगापिक्सेल वाइड अँगल लेन्स, ५ मेगापिक्सेल  टेलिफोटो लेन्स, १२ मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स, २० मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.
- या फोनमध्ये ३२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही आहे. 
- ६.४७ इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले यात असणार आहे. 
भारतात हा फोन केव्हा लाँच होईल याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. 

टिकटॉकच्या निर्माता कंपनीने आणला नवा स्मार्टफोन, पाहा फिचर्स