How To Improve Gut Health : खराब पचन संस्था आणि बिघडणारे पोट ही बऱ्याच लोकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. या मागचे कारण, खराब खाणे तसेच, खराब जीवनशैली देखील असू शकते. यामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया संपुष्टात येऊ लागतात. ज्यामुळे आतड्यापर्यंत पोहोचणारे अन्न पचण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. आतड्यातील चांगले बॅक्टेरिया नष्ट होत असतील, तर अन्न पचवण्यास त्रास होऊ शकतो आणि अन्न पोटात सडू शकते. यामुळे गॅस आणि अॅसिडिटीची समस्या तर वाढू शकतेच, शिवाय बॅड कोलेस्ट्रॉलही वाढण्याचीही शक्यता असते.
आतड्यात चांगले बॅक्टेरिया वाढवायचे असतील, तर न्यूट्रिशनिस्टच्या म्हणण्यानुसार रोज या ५ गोष्टी करायला सुरुवात करा. याचा परिणाम १० दिवसांतच दिसू लागेल. यामुळे पचनक्रिया तर सुधारेलच, शिवाय रोगप्रतिकारशक्तीही वाढेल. यासोबतच आरोग्याशी संबंधित इतर समस्यांमध्येही आराम मिळेल. न्यूट्रिशनिस्ट ख्याती रुपाणी यांनी पॉडकास्टमध्ये आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘या’ ५ गोष्टी करण्याचा सल्ला दिला आहे.
हिवाळा सुरू झाला आहे, या काळात लोक ताक पिणे टाळतात. पण, ताक हा आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम स्त्रोत आहे. रोज दुपारच्या जेवणानंतर ताक प्यायल्याने आतड्यात चांगले बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे रोज ताक प्या. अवघ्या १० दिवसांत याचा फरक दिसू लागेल.
इडली, डोसा, ढोकला, कांजी, कांजी भात, दही भात असे नैसर्गिकरित्या आंबवलेल्या पीठाचे पदार्थ आठवड्यातून किमान दोनदा खा. ते आपल्या शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतात.
रोज सकाळी मेथी आणि हळदीचा चहा प्या. यासाठी एक चमचा मेथीदाणे पाण्यात उकळून घ्यावेत. नंतर त्यात चिमूटभर काळी मिरी आणि हळद घालून प्यावे.
हिवाळ्यात शरीरातील सर्व दोषांचा समतोल राखायचा असेल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर रोज एक आवळा खा. आवळा आपल्या शरीरात प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स संतुलित करतो.
आतड्याचे आरोग्य सुधारायचे असेल, तर दररोज कोणत्याही भाजीबरोबर रात्रीच्या जेवणाची सुरुवात करा. कोशिंबीर, सूप किंवा हलक्या उकडलेल्या भाज्या खा. पण रात्रीच्या जेवणाची सुरुवात भाज्यांनीच करा. त्यानंतर कार्ब घ्या. असे केल्याने आतड्याचे आरोग्य सुधारेल.
संबंधित बातम्या