Sticker On Fruits: फळांवर का चिकटवलेला असतो स्टिकर? तुम्हाला माहितीच नसणार 'हे' कारण-sticker on fruits why is there a sticker on fruits like apple and oranges ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sticker On Fruits: फळांवर का चिकटवलेला असतो स्टिकर? तुम्हाला माहितीच नसणार 'हे' कारण

Sticker On Fruits: फळांवर का चिकटवलेला असतो स्टिकर? तुम्हाला माहितीच नसणार 'हे' कारण

Aug 04, 2024 11:00 AM IST

Sticker On Fruits: अनेकदा बाजारातून फळे देखील खरेदी करत असता. परंतु काही फळांवर स्टिकर्स असतात हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? आणि ज्या लोकांनी हे पाहिलं आहे त्यांना याचं नेमकं कारणच माहिती नाही.

फळांवरील स्टिकर्सबाबत काही महत्वाच्या गोष्टी
फळांवरील स्टिकर्सबाबत काही महत्वाच्या गोष्टी

Sticker On Fruits: फळांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे बहुतांश लोक आपल्या नियमित आहारात विविध फळांचा समावेश करतात. तुम्ही अनेकदा बाजारातून फळे देखील खरेदी करत असता. परंतु काही फळांवर स्टिकर्स असतात हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? आणि ज्या लोकांनी हे पाहिलं आहे त्यांना याचं नेमकं कारणच माहिती नाही. कारण अनेकांना वाटतं ज्या फळावर स्टीकर आहे ते फळ महागडं आहे. किंवा एखाद्या खास ठिकाणाहून मागवण्यात आलं आहे. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, फळांवर स्टीकर असण्यामागे एक वेगळंच कारण आहे. आज आपण हेच कारण जाणून घेणार आहोत.

फळांवर असलेल्या स्टिकरचा संबंध किंमतीशी नव्हे तर फळांवरील स्टिकर्सचा संबंध त्याच्या गुणवत्तेशी असतो. कारण हे स्टिकर्सच त्यांच्या गुणवत्तेची योग्य माहिती देतात. फळांवर चिकटवलेल्या स्टिकर्सवरून यावरून कोणती फळे खरेदी करावीत? आणि कोणती फळे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात हे कळू शकते. फळांवरील स्टिकर्सबाबत काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याची आवशक्यता आहे. त्या महत्वाच्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत चला पाहूया.

४ अंकी स्टिकरचा अर्थ

बाजारात सफरचंद, संत्री किंवा स्ट्रॉबेरी खरेदी करताना त्यावर स्टिकर चिकटवलेला असतो. या फळांवरील स्टिकरवर एक कोड दिलेला असतो. त्यांचे प्रकार आणि अर्थ वेगवेगळे आहेत. या कोड्सबद्दल योग्य माहिती मिळाल्यास फळांबद्दल बरेच काही जाणून घेता येते. चार अंकी कोड असलेल्या फळांवरील स्टिकर्स हे दर्शवतात की, ही फळे वाढवताना कीटकनाशके आणि रसायने वापरली गेली आहेत.

५ अंकी स्टिकरचा अर्थ

काही फळांच्या स्टिकर्सवर पाच अंकी कोड लिहिलेला असतो. परंतु हा कोड ८ अंकाने सुरू होतो, जसे की ८४१३३ किंवा ८६५३२. या फळांमध्ये संशोधनात्मक बदल करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. ही फळे सेंद्रिय नसतात. हे कीटकनाशकांनी वाढवलेल्या फळांपेक्षा थोडे महाग असू शकतात, त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.

'हा' कोड असतो सर्वोत्तम

काही फळांमध्ये ९ अंकापासून सुरू होणारा ५ अंकी कोड असतो. अर्थातच एखाद्या फळावर ९३४३५ असे लिहिलेले असते. म्हणजे ही फळे सेंद्रिय पद्धतीने पिकवली गेली आहेत. यामध्ये कोणत्याही कीटकनाशकांचा वापर करण्यात आला नाही. याला सर्वात सुरक्षित फळ म्हटले जाते. या फळांची किंमत जास्त असते. परंतु ही फळे आरोग्यासाठी उत्तम असतात.

आजकाल भारतीय बाजारपेठेत सफरचंद आणि संत्री इत्यादींवर स्टिकर्स असतात. पण त्यावर कोणताही कोड लिहिण्याऐवजी त्यावर एक्सपोर्ट क्वालिटी, बेस्ट क्वालिटी किंवा प्रीमियम क्वालिटी असे शब्द लिहिलेले असतात. हे बनावट स्टिकर्स आहेत. हे खरेदीदारांना फसवण्यासाठी किंवा त्यांच्याकडून जास्त पैसे वसूल करण्यासाठी केलेले असतात.

 

 

विभाग