मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Muesli Recipe: मुसलीच्या या आरोग्यदायी रेसिपीने तुमच्या दिवसाची सुरुवात करा, नोट करा रेसिपी!

Muesli Recipe: मुसलीच्या या आरोग्यदायी रेसिपीने तुमच्या दिवसाची सुरुवात करा, नोट करा रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 09, 2024 08:52 AM IST

Breakfast Recipe: आज आम्ही तुमच्यासाठी सुपर हेल्दी ब्रेकफास्ट मुसलीची रेसिपी घेऊन आलो आहोत. जाणून घ्या सोपी रेसिपी.

Healthy Breakfast Recipe
Healthy Breakfast Recipe (Freepik)

How To Make Muesli Recipe: बऱ्याच लोकांना असे वाटते की दररोज सकाळी निरोगी नाश्ता केला पाहिजे. परंतु हेल्दी नाश्ता पर्याय शोधण्यात दररोज बराच वेळ जातो. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी एक हेल्दी पर्याय घेऊन आलो आहोत. सकाळच्या नाश्त्यासाठी यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. तुम्ही विविध फूड कॉम्बिनेशनसह घरच्या घरी मुसली (muesli smoothie) बनवून खाऊ शकता. मुसली खाल्ल्याने तुमची भूक तर शमतेच पण आरोग्यासाठीही मुसली खूप फायदेशीर आहे. मुसली खाल्ल्याने तुमचे वजन सहज कमी होण्यास मदत होते, टाईप २ मधुमेहाच्या रुग्णांसाठीही मुसली खूप फायदेशीर आहे. फायबरचे प्रमाण जास्त असल्याने मुसली शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. हे सर्व फायदे मिळवण्यासाठी मुसलीची ही रेसिपी कशी बनवायची ते...

लागणारे साहित्य

१०० ग्रॅम मुसली

२०० ग्रॅम दूध (मलईशिवाय)

स्ट्रॉबेरी

केळी

ड्राय फ्रुट्स (पिस्ता, बदाम)

अंबाडी बिया

भोपळ्याच्या बिया

जाणून घ्या कृती

मुसलीचा नाश्ता बनवण्यासाठी आधी तुम्हाला आवडते त्या फ्लेवरची मुसली घ्या. आता १०० ग्रॅम मुस्ली घ्या आणि त्यात २०० ग्रॅम गरम दूध घाला. आता त्यांना मिक्सरच्या भांड्यात ठेवा. यासोबत पिस्ता, बदाम आणि १ स्ट्रॉबेरी देखील घाला. आता त्यांना मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आता ही स्मूदी एका भांड्यात काढा. आता त्यावर चिरलेली स्ट्रॉबेरी घाला आणि वर फ्लेक्स बिया आणि भोपळ्याच्या बिया घाला. तुमचा मुसली नाश्ता तयार आहे.

WhatsApp channel