मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rava Vada Recipe: वर्षाची सुरुवात करा 'रवा मेदू वडा'ने, झटपट तयार होईल रेसिपी!

Rava Vada Recipe: वर्षाची सुरुवात करा 'रवा मेदू वडा'ने, झटपट तयार होईल रेसिपी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 31, 2023 11:06 PM IST

Breakfast Recipe: दक्षिण भारतीय पदार्थ नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. नाश्त्यात रवा मेदू वडा गरमागरम सांबारसोबत खायला मिळाला तर मजा येईल. चला जाणून घेऊयात रेसिपी..

Healthy Breakfast Recipe
Healthy Breakfast Recipe (Freepik)

Suji Vada Recipe: जर तुम्हाला वर्षाच्या पहिल्या दिवशी नाश्त्यात काही हेल्दी आणि चविष्ट खायचे असेल तर तुम्ही मेदू वडा खाऊ शकता. असेही ब्रेकफास्टसाठी दक्षिण भारतीय पदार्थ खूप उत्तम ठरतात. जर तुम्हाला इडली आणि डोसा खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही रवा मेदू वडा करून पाहू शकता. गरमागरम सांबारसोबत मेदू वडा खायला खूप चविष्ट लागते. रव्यापासूनही मेदू वडा बनवू शकता. हे वडे पचायला सोपे असतात आणि रव्यापासून बनवलेले असल्यामुळे ते कुरकुरीत होतात. तुम्ही हे वडे नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी खाऊ शकता. शेंगदाण्याची चटणी किंवा सांबारसोबत गरमागरम मेदू वडा देखील हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यास मदत करतो. जाणून घेऊयात रवा मेदू वडा कसा बनवायचा ते.

लागणारे साहित्य

१ कप रवा

१ कप पाणी

अर्धा चमचा जिरे

१/४ चमचे काळी मिरी

१ चमचे तेल

१ चमचा लिंबाचा रस

थोडी हिरवी कोथिंबीर

१ हिरवी मिरची बारीक चिरलेली

२-३ कढीपत्ता

चवीनुसार मीठ

वडा तळण्यासाठी तेल

जाणून घ्या कृती

रवा मेदू वडा तयार करण्यासाठी, प्रथम रवा शिजवा. एका पॅनमध्ये पाणी, तेल आणि मीठ एकत्र करून पाणी उकळू द्यावं लागेल.

आता पाण्यात रवा घाला आणि ढवळत असताना शिजवा. पाणी पूर्णपणे कोरडे होईपर्यंत ते शिजवावे लागते.

आता एका भांड्यात शिजवलेला रवा काढून सर्व मसाले एकत्र करून घ्या.

तुम्हाला काही कढीपत्ता चिरून त्यात काळी मिरी, जिरे, मिरची, चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालावा लागेल.

आता सर्व गोष्टी मिक्स करा आणि रव्यापासून बॉलचा आकार तयार करा, तो थोडा सपाट करा आणि मध्यभागी एक छिद्र करा.

कढईत तेल टाका आणि गरम झाल्यावर वडे घालून तळून घ्या.

गॅसची आच मध्यम ठेवावी आणि वडा सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

कुरकुरीत मेदू वडे तयार आहेत, नारळाच्या चटणी किंवा सांबारसोबत गरमागरम सर्व्ह करा.

लहान मुलांनाही टोमॅटो सॉससोबत मेदू वडा खायला आवडतो.

WhatsApp channel