Good Morning Wishes: सकारात्मक विचारांनी करूया दिवसाची सुंदर सुरुवात, प्रियांजनांनाही पाठवा शुभ सकाळ
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: सकारात्मक विचारांनी करूया दिवसाची सुंदर सुरुवात, प्रियांजनांनाही पाठवा शुभ सकाळ

Good Morning Wishes: सकारात्मक विचारांनी करूया दिवसाची सुंदर सुरुवात, प्रियांजनांनाही पाठवा शुभ सकाळ

Nov 06, 2024 08:37 AM IST

Good Morning Wishes In Marathi :जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे सुविचारांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता मिळते.

Good Morning Status
Good Morning Status (pixabay)

Good Morning Status:  एखाद्या व्यक्तीला चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले, तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे सुविचारांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता मिळते. तुम्हालाही तुमचा दिवस इतरांसारखा बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.

 

हसता-खेळता घालवुया दिवसाचा,

प्रत्येक क्षण..

भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया,

प्रसन्न मन..

 

उत्तर म्हणजे काय ते,

प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…

जबाबदारी म्हणजे काय हे,

त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…

 

जो फक्त वर्षाचा विचार करतो,

तो धान्य पेरतो…

जो दहा वर्षाचा विचार करतो,

तो झाडे लावतो…

जो आयुष्यभराचा विचार करतो,

तो माणुस जोडतो…

शुभ सकाळ !

 

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,

नाजूक उन्हाची प्रेमळ साद,

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,

रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…

 

स्वतासाठी सुंदर घर करणे हे

प्रत्येकाचे एक स्वप्न असते,

पण.. एखाद्याच्या मनात घर करणे,

यापेक्षा सुंदर काहीच नसते…

सुप्रभात!

नाते सांभाळायचे असेल तर

चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,

आणि,नाते टिकवायचे असेल तर

नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..

शुभ सकाळ!

 

वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..

कारण वेळ “चांगली” असेल तर,

सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर,

“आपले” पण “परके” होतात..

वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते…

शुभ सकाळ!

 

यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर

दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.

कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.

तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.

सुप्रभात शुभ सकाळ!

 

मी लोकांसाठी माझे विचार व

राहणीमान बदलू शकत नाही.

कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा

ती दुरावलेली मला चालतात.

शुभ सकाळ !

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..

म्हणून काही माणसे क्षणभर,

तर काही माणसे

आयुष्यभर लक्षात राहतात..

शुभ सकाळ !

Whats_app_banner