मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Moonglet Recipe: दिवसाची सुरुवात करा हेल्दी, नाश्त्यात बनवा प्रोटीनयुक्त मूंगलेट्स!

Moonglet Recipe: दिवसाची सुरुवात करा हेल्दी, नाश्त्यात बनवा प्रोटीनयुक्त मूंगलेट्स!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Feb 22, 2023 09:42 AM IST

Breakfast Recipe: मूंगलेट हा पदार्थ पौष्टिकतेने परिपूर्ण आहे, प्रथिने समृद्ध आहे आणि चवीलाही अप्रतिम आहे. जाणून घ्या याची सोपी रेसिपी

हेल्दी नाश्ता
हेल्दी नाश्ता (freepik )

Healthy Breakfast Moonglet: जर तुम्हालाही तुमच्या आरोग्याची काळजी घेत नाश्त्यात काहीतरी हेल्दी आणि चविष्ट बनवायचे असेल तर तुम्ही मूंगलेट बनवू शकता. हा नाश्ता पौष्टिकतेने परिपूर्ण आहे, प्रथिनांनी समृद्ध आहे आणि चवीलाही अप्रतिम आहे. लहान मुले असो वा प्रौढ सर्वांनाच हा पदार्थ खूप आवडेल. ते खाल्ल्यानंतर तुम्हाला जडही जाणवणार नाही. झटपट तयार होत असल्यामुळे महिलांसाठी बनवणेही खूप सोपे आणि कमी वेळेचे आहे.आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, प्रथिनांच्या व्यतिरिक्त, मूग डाळमध्ये कॅल्शियम आणि लोह देखील भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि स्नायूंना होणारा त्रास टाळता येतो. जाणून घ्या मूंगलेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य

मूग डाळ - दोन वाट्या

टोमॅटो - १ ते २

बीट - १/२

गाजर - १

शिमला मिरची - २

हिरवी मिरची - १ ते २

कांदा - १

आले चिरून - १ टीस्पून

हिरवी कोथिंबीर चिरलेली - १/४ कप

बेकिंग सोडा - १ टीस्पून

चाट मसाला - १ टीस्पून

हळद - १/२ टीस्पून

तेल - ४ ते ५ चमचे

मूंगलेट बनवण्याची रेसिपी

> मूगलेट्स बनवण्यासाठी, प्रथम मूग डाळ पूर्णपणे धुवा, आता डाळ २ तास पाण्यात भिजत ठेवा.

> आता बीट, टोमॅटो आणि इतर भाज्या चिरून घ्या आणि मिक्सिंग बाऊलमध्ये ठेवा.

> आता मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

> डाळ बारीक करताना त्यात आल्याचे तुकडे आणि थोडे पाणी घाला.

> डाळ बारीक करून घट्ट पेस्ट बनवा आणि नंतर एका भांड्यात काढा.

> डाळीची पेस्ट तयार झाल्यावर या पिठात हळद, खाण्याचा सोडा टाका आणि पिठात चांगले मिक्स करा.

> एका भांड्यात हे तयार केलेलं पीठ घ्या आणि ते तव्याच्या मध्यभागी ओता आणि गोलाकार पसरवा. थोडा जाड ठेवा.

> मूंगलेट्स थोडा वेळ शिजल्यावर वर बारीक चिरलेल्या भाज्या ठेवा आणि नंतर चाट मसाला शिंपडा.

> आता मुंगलेटला दुसऱ्या बाजूला उलटा.

> दोन्ही बाजूंनी सोनेरी झाल्यावर प्लेटमध्ये काढून टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग