मराठी बातम्या  /  Lifestyle  /  Start River Rafting From This Point For Full Enjoy In Rishikesh Uttarakhand

River Rafting साठी ऋषिकेशला जाताय? पूर्ण आनंद घेण्यासाठी या पॉइंटपासून सुरू करा

रिव्हर राफ्टिंग
रिव्हर राफ्टिंग
Hiral Shriram Gawande • HT Marathi
Jun 03, 2023 08:52 PM IST

Advencher Travel: रिव्हर राफ्टिंगसाठी ऋषिकेश खूप लोकप्रिय आहे. या मजेशीर अॅक्टिव्हिटीमध्ये लोक आपल्या कुटूंब, मित्रांसोबत सहभागी होतात. जर तुम्हाला पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर कोणत्या पॉईंटपासून राफ्टिंग सुरू करायचे ते जाणून घ्या.

River Rafting at Rishikesh Uttarakhand: उन्हाळ्यात लोकांना थंड ठिकाणी जायला आवडते. याशिवाय ज्या लोकांना साहसाची आवड आहे ते अशा काही अॅक्टिव्हिटीच्या शोधात असतात जे करणे मजेदार असेल आणि उष्णतेपासून आराम देखील मिळेल. अशा परिस्थितीत राफ्टिंग हे आवडती अॅक्टिव्हिटी आहे. उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून लोक रिव्हर राफ्टिंगसाठी जातात. ऋषिकेशचे रिव्हर राफ्टिंग संपूर्ण भारतात खूप लोकप्रिय आहे. पण तुम्हाला माहित आहे का की राफ्टिंगसाठी वेगवेगळे पॉइंट्स आहेत, इथे आम्ही सांगत आहोत की तुम्ही पूर्ण एन्जॉय करण्यासाठी कोणत्या पॉईंटपासून राफ्टिंगला सुरुवात करावी.

ट्रेंडिंग न्यूज

ऋषिकेशमधील रिव्हर राफ्टिंग पॉइंट्स

ब्रह्मपुरी

जर तुम्ही ब्रह्मपुरी येथून रिव्हर राफ्टिंग सुरू करत असाल तर या राफ्टिंगमधील अंतर ८ ते १० किमी आहे. हे राफ्टिंग पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सुमारे एक ते दीड तास लागेल. हा सर्वात लहान रिव्हर राफ्टिंग ट्रॅक आहे.

मरीन ड्राइव्ह

जर तुम्हाला रिव्हर राफ्टिंगचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही मित्रांसोबत या ट्रॅकचा आनंद घेऊ शकता. या मार्गात तुम्हाला मरीन ड्राइव्ह ते शिवपुरी राफ्टिंगसाठी नेले जाईल. राफ्टिंग प्रेमींसाठी हा आवडता मार्ग आहे. हा किमान १० किलोमीटरचा मार्ग आहे.

कौडियाला

कौडियाला ते ऋषिकेशपर्यंत राफ्टिंग सुरू होते. यामध्ये तुम्हाला खूप रॅपिड्स सापडतील. राफ्टिंग निम बीचवर संपते. हा एकूण मार्ग ३६ किलोमीटरचा आहे. ज्याला ५ ते ६ तास लागतात. राफ्टिंगचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी तुम्ही या मार्गावर जाऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel