Sore Throat : वाढत्या प्रदूषणामुळे घसा सतत खवखवतोय? ‘या’ घरगुती उपायांनी झटक्यात वाटेल बरं! नक्की ट्राय करा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sore Throat : वाढत्या प्रदूषणामुळे घसा सतत खवखवतोय? ‘या’ घरगुती उपायांनी झटक्यात वाटेल बरं! नक्की ट्राय करा

Sore Throat : वाढत्या प्रदूषणामुळे घसा सतत खवखवतोय? ‘या’ घरगुती उपायांनी झटक्यात वाटेल बरं! नक्की ट्राय करा

Nov 11, 2024 01:16 PM IST

Home Remedies For Sore Throat :प्रदूषणामुळे खोकला आणि घसा खवखवणे यासारख्या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.काही घरगुती उपाय करूनही तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता.

Sore Throat Home Remedies
Sore Throat Home Remedies

Sore Throat Home Remedies :  सध्या सगळीकडेच वायू प्रदूषणामुळे हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात सातत्याने वाढ होत आहे. अनेक भागात तो ३००च्या पुढे गेला आहे. यातच फटाक्यांच्या धुरामुळे देखील प्रदूषण वाढले आहे. या विषारी हवेचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. या प्रदूषणामुळे खोकला आणि घसा खवखवणे यासारख्या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.

घसादुखीसाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे आणि सिरप उपलब्ध आहेत, ज्याचा वापर केल्याने तुम्हाला तात्काळ आराम मिळतो. परंतु, जर तुम्हाला हवे असेल तर काही घरगुती उपाय करूनही तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्या वापरून तुम्ही खोकला आणि घसा खवखवणे यासारख्या गंभीर समस्यांपासून आराम मिळवू शकता. तुम्हालाही घसा दुखी आणि खवखव जाणवत असेल, तर या टिप्स नक्की ट्राय करा...

कोमट पाण्याने गुळणी करा : जर तुम्हाला घसादुखीचा त्रास होत असेल, तर कोमट पाण्यात चिमूटभर मीठ घालून दिवसातून २-३ वेळा गुळण्या करा. घशातील सूज आणि खवखव कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

आले आणि मधाचे सेवन : घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा तुकडा चघळवा किंवा गरम पाण्यात उकळा आणि नंतर त्यात मध मिसळून प्या. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे घसा खवखवणे कमी करण्यास मदत करतात. 

हळदीचे दूध : रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने घसादुखीपासून आराम मिळतो. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्ही देखी हा उपाय वापरू शकता. 

Viral Video : अंजीर हे मांसाहारी फळ? काय आहे व्हायरल चर्चेमागचं सत्य? व्हिडीओतून जाणून घ्या

वाफ घ्या : गरम पाण्यात निलगिरीचे तेल घालून वाफ घ्या. यामुळे घशाला आराम मिळतो आणि श्लेष्माही साफ होतो. वाफ घेतल्याने इतर अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो. 

तुळस आणि काळी मिरी चहा : घसा खवखवत असताना जर तुम्ही गरमागरम चहा घेण्याचा विचार करत असाल, तर त्यात तुळशीची पाने टाका आणि उकळा. त्यात थोडी काळी मिरी देखील घाला. या चहाचे सेवन केल्याने घसादुखीपासून आराम मिळतो.

कोमट पाणी प्या : जर तुम्हाला घसा दुखण्याने त्रास होत असेल, तर दिवसभर थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्या. यामुळे घशातील आर्द्रता टिकून राहते आणि दुखण्यापासून आराम मिळतो.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner