मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bride Skin Care: लवकरच वधू बनणार आहात? आजपासूनच सुरु करा स्किन केअर!

Bride Skin Care: लवकरच वधू बनणार आहात? आजपासूनच सुरु करा स्किन केअर!

Dec 07, 2023 07:51 PM IST

Pre bridal skin care: लग्नाच्या एक महिना आधी त्वचेची काळजी घेणे सुरू करणे महत्त्वाचे आहे.

Skin Care Tips
Skin Care Tips (Freepik)

Skin Care Tips For Bride: जर तुमचं लग्न होणार असेल तर तुम्ही आजपासूनच तुम्ही स्किन केअर करायला सुरुवात करा. लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खास क्षण असतो. या खास दिनी प्रत्येकाला छान दिसायचं असतं. यासाठी वधू फार आधीपासूनच तयारी करू लागते. मुलींनी कितीही मेकअप केला तरी, त्यांना त्यांच्या खास दिवसासाठी त्यांची त्वचा आतून ग्लो होयला हवी असते. यासाठी एक प्रकारचं रुटीन फॉलो करणे गरजेचे आहे. कारण जेव्हा मुलगी लग्नासाठी तयार होत असते, तेव्हा खराब झालेल्या त्वचेमुळे तिचा मेकअप सेट होऊ शकत नाही आणि तिचा संपूर्ण लुक खराब होतो. त्यामुळे लग्नाच्या एक महिना आधी त्वचेची काळजी घेणे सुरू करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या खास दिवशी त्याचे फायदे दिसतील. तुमच्या स्किन केअर किटमध्ये काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे.

फेशियल ऑईल वापरा

फेशियल ऑईलमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. रोजच्या त्वचेची काळजी घेण्यात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे हे ड्रॉप करण्याची चूक करू नका. तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेशियल ऑईल निवडले पाहिजे. फेशियल ऑइल वापरल्याने तुम्हाला काही दिवसातच फरक दिसू लागेल.

गुलाबपाणी

गुलाबपाणी तर स्किन केअरचा महत्त्वाचा भाग आहे. हे सतत लावल्याने चेहरा गुलाबासारखा चमकू लागतो. याच्या रोजच्या वापराने तुमची त्वचा हायड्रेट राहते.

ट्रेंडिंग न्यूज

सनस्क्रीन सर्वात महत्वाचे

तुम्ही घरी रहा किंवा बाहेर जा, सनस्क्रीन लावायला विसरू नका. हे तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते.

क्लींज करणे महत्वाचे आहे

चेहऱ्यावरील घाण साफ करण्यासाठी क्लिंजर वापरा. यामुळे तुमची त्वचा आतून स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावरील छिद्रही उघडतील. तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार क्लींजर निवडले पाहिजे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel