वर्षातील पहिला सण मकर संक्रांती नुकताच झाला. हिवाळ्यात अनेक सण असतात. सण म्हंटल की पारंपरिक कपडे घालणं आलंच. त्याशिवाय सणांचं सेलिब्रेशन पूर्ण होतं नाही. आपण अनेकदा फॅशनचा ट्रेंड फॉलो करण्यासाठी सेलिब्रिटींची फॅशन फॉलो करतो. अभिनेत्री सोनम कपूरला फॅशन क्वीन मानले जाते. जर तुम्हाला हिवाळ्यातील सणासाठी एथनिक लूक कॅरी करायचा असेल तर तुम्ही सोनम कपूरच्या लूकपासून प्रेरणा घेऊ शकता. एक नजर टाकूया तिच्या लूकवर..
या फोटोमध्ये सोनम कपूरने खूप सुंदर प्रिंटेड अनारकली सूट घातला आहे. सोनमच्या जांभळ्या अनारकली कुर्त्याला केशरी रंगाची भारी बॉर्डर आहे. हा सूट खरोखरच सणाला घालण्यासाठी बेस्ट आहे.
या कुर्त्यासोबत जांभळ्या रंगाची चुरीदार सलवार जोडली आहे. जांभळ्या आणि पांढर्या प्रिंटसह केशरी रंगाचा बॉर्डर असलेला दुपट्टा पेअर केला आहे.
सोनमने अॅक्सेसरीजसाठी पारंपारिक गोल्डन डँगलर कानातले कॅरी केले आहेत. हे कानातले सोनमच्या चेहऱ्याला खूप शोभत आहेत. तुम्ही असे कानातले पण कॅरी करू शकता.
सोनमने कोहल-रिम्ड आय मेकअप केला आहे. ग्लोसी लिप शेड लावली आहे. हेअरस्टाईल साठी सोनमने मधला भाग पाडून दोन्ही बाजूने पुढे वेणी बांधली आहे.या लूकमध्ये सोनम खूपच सुंदर दिसत आहे.
संबंधित बातम्या