Specialities in Sonakshi Sinha Reception Look: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालसोबत आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. काल संध्याकाळी म्हणजे २३ जून रोजी दोघांचं लग्न झालं आणि त्यानंतर या कपलचा ग्रँड वेडिंग सोहळा मुंबईत पार पडला. या अभिनेत्रीच्या लग्नात बॉलिवुडमधील अनेक स्टार्स सहभागी झाले आहेत. रिसेप्शन पार्टीसाठी सोनाक्षीने लाल रंगाची साडी नेसली होती. ज्यानंतर तिच्या लूकचे खूप कौतुक होत आहे. पाहा सोनाक्षीच्या लूकबद्दल या ५ खास गोष्टी
नववधूने नेहमी हेवी कपडे निवडावेत असे मानले जाते. मात्र, हे योग्य नाही. अभिनेत्री सोनाक्षीने सुद्धा हा स्टीरियोटाइप मोडीत काढत लग्न आणि रिसेप्शनसाठी साध्या साडीची निवड केली आहे. वेडिंग रिसेप्शनसाठी सोनाक्षीने लाल रंगाची चांद बुटा वाराणसी सिल्क ब्रोकेड साडी परिधान केली होती.
अभिनेत्रीने साडीसोबत ब्लाउज डिझाईन देखील सिंपल ठेवले होते. जे दिसायला सोबर आणि डिसेंट वाटत होते. ब्लाउजला समोरून गोल गळा आहे आणि मागून देखील त्याचा पॅटर्न देखील साधा ठेवण्यात आला होता. अभिनेत्रीने तिच्या लूकसाठी बॅकलेस ब्लाऊज ची निवड केली नाही.
सुंदर दिसण्यासाठी आणि लूक खास बनवण्यासाठी अभिनेत्रीने लाल रंगाच्या साडीसह सिंगल चोकर सेट कॅरी केला. या चोकर सेटवर हिरवे मोती जडलेले होते.
बहुतेक अभिनेत्री जेव्हा नेकलेस घालतात, तेव्हा कानांसाठी स्टड स्टाईल इयररिंग्सची निवड करतात. मात्र सोनाक्षीने तसे केले नाही. या लूकमध्ये अभिनेत्रीने सेटला मॅचिंग लाँग ईयररिंग्स कॅरी केले आहे.
लग्नाआधी सर्व वधू मेहंदीने हात सजवतात. मात्र, सोनाक्षीने लग्नासाठी मेहंदी लावली नाही. फोटो पाहून अंदाज बांधता येऊ शकतो की, अभिनेत्रीने आपल्या हातावर आलता लावला आहे. तथापि, ती लाल मेहंदी देखील असू शकते. हातावरचा हा पॅटर्न खूपच सुंदर दिसतो.
संबंधित बातम्या