मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sonakshi Sinha: प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सोनाक्षीने घातला निळ्या रंगाचा सूट, या डिझाईनचे नाव माहीत आहे का?

Sonakshi Sinha: प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सोनाक्षीने घातला निळ्या रंगाचा सूट, या डिझाईनचे नाव माहीत आहे का?

Jun 23, 2024 07:21 PM IST

Sonakshi Sinha Pre Weeding Function: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नाआधी प्री-वेडिंग फंक्शनसाठी तिने निळ्या रंगाचा सूट घातला होता. पाहा कसा आहे तो सूट आणि त्याची डिझाईन

सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हा

Sonakshi Sinha in Blue Ethic Attire: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान, सिन्हा कुटुंबाने त्यांच्या 'रामायण' या घरात पूजा केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाआधीच्या या फंक्शनमध्ये तिने निळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. या फोटोमध्ये सोनाक्षी तिची आई पूनम सिन्हासोबत पूजेत बसलेली दिसत आहे. सोनाक्षीचा या पूजेला जाण्याचा व्हिडिओ समोर आल्यापासून लोक तिच्या सूटचे आणि तिचे कौतुक करत आहेत. जाणून घ्या कसा होता सोनाक्षीचा सूट आणि या डिझाइनचे नाव

ट्रेंडिंग न्यूज

कसा आहे हा निळा सूट

सोनाक्षीने पूजासाठी निळ्या रंगाचा आकर्षक शेड निवडला. या प्रकारच्या सूटला कुर्ता प्लाझो सेट असे म्हणतात, जो मॅचिंग कर्लरमध्ये येतो. उन्हाळ्याच्या दिवसासाठी हा आरामदायी, मोकळा सूट आहे. यात व्ही-नेकलाइन, फ्लेयर्ड स्लीव्ह्स देण्यात आले आहेत. हा सूट लूज फिटिंगमध्ये येतो. तिने तो मॅचिंग प्लाझो पँटसोबत घातला, जो एक परफेक्ट मोनोक्रोम लुक होता.

सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हा

सोबत घेतला वेगळा दुपट्टा

या रंगात आणखी भर घालण्यासाठी तिने आपला आउटफिट मोरपंखी रंगाच्या सिक्विन नेटेड दुपट्ट्यासोबत पेअर केला. सोनाक्षीने आपला लूक मिनिमल ठेवला आहे. या लूकमध्ये तिने फक्त एक ब्लॅक रिस्ट वॉच आणि पांढरे स्लाइडर्स स्टाईल केले आहेत.

ग्लॅमरस मेकअप

तिच्या ग्लॅमरस मेकअप लूकमध्ये विंग्ड आयलाइनर, मस्कारा कोटेड लॅशेस, न्यूड आयशॅडो, डार्क ब्रो, ब्लश गाल, ग्लॉसी हायलाइटर आणि पिंक लिपस्टिकची शेड यांचा समावेश आहे. तिने आपल्या लांब, चमकदार केसांना नीटनेटक्या बनमध्ये स्टाइल केले आहे, जे तिच्या लुकला कॉम्प्लिमेंट करत आहे.

WhatsApp channel