Snoring Tips: रात्री झोपेत जोर-जोरात घोरता? 'या' २ उपायांनी सुटेल सवय
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Snoring Tips: रात्री झोपेत जोर-जोरात घोरता? 'या' २ उपायांनी सुटेल सवय

Snoring Tips: रात्री झोपेत जोर-जोरात घोरता? 'या' २ उपायांनी सुटेल सवय

Oct 25, 2024 10:39 AM IST

Ayurvedic Remedies for Snoring: अनेकांना रात्री घोरण्याची सवय असते. ती व्यक्ती गाढ झोपेत गेल्यावर घोरायला लागते. अशा स्थितीत जवळ झोपलेल्या व्यक्तीला काळजी वाटू लागते.

Home Remedies for Snoring
Home Remedies for Snoring (freepik)

Home Remedies for Snoring:   घोरणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु त्याचा तुमच्या झोपेवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अनेकांना रात्री घोरण्याची सवय असते. ती व्यक्ती गाढ झोपेत गेल्यावर घोरायला लागते. अशा स्थितीत जवळ झोपलेल्या व्यक्तीला काळजी वाटू लागते. घोरण्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. या समस्येपासून कशी सुटका मिळेल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

घोरण्याच्या समस्येचे कारण-

घोरण्याच्या समस्येमागे अनेक कारणे आहेत. लठ्ठपणा, नाक आणि घशाचे स्नायू कमकुवत होणे, सर्दी, धूम्रपान, श्वसन समस्या, फुफ्फुसात योग्य ऑक्सिजनची कमतरता आणि सायनसची समस्या ही त्याची सुरुवातीची कारणे आहेत.

घोरण्यापासून मुक्त होण्यासाठी या २ टिप्स फॉलो करा

-झोपण्याची स्थिती बदला.

-तुमच्या पाठीऐवजी तुमच्या पोटावर झोपल्याने तुम्हाला श्वास घेणे सोपे होईल.

तुम्ही तुमच्या पलंगाचे हेडरेस्ट थोडे उंच ठेवून तुमची झोपेची स्थिती सुधारू शकता.

जीवनशैलीत बदल करा-

नियमित व्यायाम आणि वजन कमी केल्याने तुमची श्वास घेण्याची क्षमता सुधारते.

धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन बंद केल्याने तुमचे आरोग्य सुधारते, ज्यामुळे तुम्हाला घोरण्याची समस्या होणार नाही.

झोपण्यापूर्वी जड अन्न खाऊ नका आणि पुरेशी झोप घ्या.

याशिवाय तुम्ही या उपायांचा अवलंब करू शकता-

-झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करावी.

-झोपण्यापूर्वी कॉफी आणि चहा पिऊ नका.

-झोपण्याची खोली बंध करू नका म्हणजेच खिडक्या उघड्या ठेवा.

याशिवाय जर तुमची घोरण्याची समस्या गंभीर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

घोरण्यावर इतर घरगुती उपाय-

पुदिना-

जर तुम्ही कोमट पाण्यात पेपरमिंट ऑइल घालून गुळण्या केल्या तर घोरण्याची समस्या काही दिवसातच दूर होऊ शकते. याशिवाय कोमट पाण्यात पुदिन्याची पाने उकळून प्यायल्यास घोरण्याची समस्याही हळूहळू दूर होऊ शकते.

ऑलिव्ह तेल-

ऑलिव्ह ऑईल नाकात टाकल्याने श्वास घेण्याच्या त्रासापासून आराम मिळतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब नाकात टाकावेत. त्यामुळे घोरण्याची समस्याही हळूहळू दूर होते.

हळदी-

हळदीचा वापर करून नाक साफ करता येते. यामुळे श्वास घेणे सोपे होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात एक चमचा हळद टाकून प्या.

देशी तूप-

देशी तुपाच्या सेवनाने तुम्ही घोरण्याच्या समस्येपासूनही सुटका मिळवू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला देसी तूप हलके गरम करावे लागेल. यानंतर तुपाचे काही थेंब नाकात टाकल्याने घोरण्याची समस्या दूर होते.

लसूण

रात्री झोपण्यापूर्वी लसणाची एक पाकळी कोमट पाण्यासोबत गिळून टाका. घोरण्यापासून आराम मिळेल.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner