Lemon Coriander Noodles Recipe: लहान मुले असो वा मोठे मॅगीची क्रेझ सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. पण जर तुम्हाला साधी मॅगी खाण्याचा कंटाळा आला असेल तर नूडल्सची पूर्णपणे वेगळी टेस्टी आणि सोपी रेसिपी ट्राय करून पाहा. ही रेसिपी म्हणजे लेमन कोरिअंडर नूडल्स. आजकाल लिंबू आणि कोथिंबीर एकत्र करून तयार केलेल्या या नूडल्सची लोकांमध्ये खूप क्रेझ असल्याचे पाहायला मिळते. चिली गार्लिक नूडल्स नंतर लोकांमध्ये सर्वाधिक पसंतीचे नूडल्स म्हणजे लेमन कोरिएंडर नूडल्स आहेत. तुमच्या संध्याकाळच्या स्नॅक्स टाईमसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे, जी झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे लेमन कोरिएंडर नूडल्स.
- १ भाग वाफवलेले नूडल्स
- १/२ कप चिरलेली कोथिंबीर
- ३ लसूण पाकळ्या
- १/२ कांदा
- १/२ लिंबू
- १ टीस्पून मॅगी मॅजिक मसाला
- १ टीस्पून चिली फ्लेक्स
- १ टीस्पून सोया सॉस
- १ टीस्पून रेड चिली सॉस
- १/४ कप गरम तेल
लेमन कोरिएंडर नूडल्स बनवणे खूप सोपे आहे. हे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाउलमध्ये उकळलेले नूडल्स घ्या. आता त्यात चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा, मॅगी मॅजिक मसाला, चिली फ्लेक्स, सोया सॉस, रेड चिली सॉस, गरम तेल, लिंबाचा रस टाका. हे सर्व गोष्टी नीट मिक्स करा. तुमचे स्ट्रीट स्टाइल लेमन कोरिएंडर नूडल्स तयार आहेत. संध्याकाळच्या स्नॅकमध्ये तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.
संबंधित बातम्या