Snacks Recipe: मुलांसाठी झटपट बनवा रव्याचे बॉल्स, टेस्टी आहे ही रेसिपी-snacks recipe how to make rava or suji balls for kids ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Snacks Recipe: मुलांसाठी झटपट बनवा रव्याचे बॉल्स, टेस्टी आहे ही रेसिपी

Snacks Recipe: मुलांसाठी झटपट बनवा रव्याचे बॉल्स, टेस्टी आहे ही रेसिपी

Feb 10, 2024 07:12 PM IST

Recipe for Kids: जर तुम्हाला संध्याकाळी मुलांना काहीतरी टेस्टी स्नॅक्स खायला द्यायचे असेल तर रव्याचे बॉल्स बनवा. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि झटपट तयार होते.

रव्याचे बॉल्स
रव्याचे बॉल्स (freepik)

Rava or Suji Balls Recipe: अनेकदा मुलांना संध्याकाळी काहीतरी चटपटीत आणि वेगळे खावेसे वाटते. तसं तर यावेळी त्यांना फास्ट फूड किंवा जंक फूड खाण्याची क्रेविंग होते. अशा परिस्थितीत बाहेरून आणलेले अनहेल्दी पदार्थ खाऊ घालण्याऐवजी तुम्ही त्यांच्यासाठी चविष्ट आणि चटपटीत पदार्थ घरी बनवू शकता. जेणेकरून त्यांची भूक भागवता येईल. घरच्या घरी उपलब्ध असलेल्या घटकांसह मुलांसाठी रव्याचे बॉल्स पटकन बनवा. ही रेसिपी झटपट तयार होते आणि खायलाही टेस्टी आहे. चला तर जाणून घ्या ही सोपी रेसिपी.

रव्याचे बॉल्स बनवण्यासाठी साहित्य

- २५० ग्रॅम रवा

- अर्धी वाटी किसलेले चीज

- १ कांदा बारीक चिरून

- १ टीस्पून ठेचलेली लाल मिरची

- अर्धा टीस्पून जिरे

- अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर

- कोथिंबीर बारीक चिरलेली

- चवीनुसार मीठ

- पाणी आवश्यकतेनुसार

रव्याचे बॉल्स बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम कढईत साडे सहाशे ग्रॅम पाणी टाकून गॅसवर ठेवा. पाणी तापायला लागल्यावर त्यात मीठ टाका. तसेच ठेचलेली लाल मिरची, जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घाला. तसेच काळी मिरी घालावी. आता ते मिक्स करून पाण्यात रवा घाला. रवा घालताना पाणी ढवळत राहा. नंतर पाण्यात रवा नीट मिक्स करा. जाडसर द्रावण चमच्याचे साहाय्याने ढवळून शिजवून घ्या. काही वेळाने तुम्हाला दिसेल की सर्व पाणी आटले आहे आणि रवा घट्ट मळलेल्या पीठाचा एकसमान झाला आहे तेव्हा गॅस बंद करा आणि आता एका भांड्यात काढा आणि थोडे थंड होऊ द्या. हाताने स्पर्श करण्याइतपत गरम असताना त्यात चीज किसून टाका आणि मिक्स करा. आता नीट मिक्स करून मळून घ्या. 

आता याला तुमच्या आवडीनुसार गोल, अंडाकार, चपटा आकार द्या. आता हे गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. गरमागरम टेस्टी बॉल्स टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.

विभाग