Pizza Dhokla Recipe: लहान मुले असो वा मोठे पिझ्झा खायला कोणाला आवडत नाही. पण प्रत्येक वेळी बाहेरील पिझ्झा खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा वेळी महिला घरीच वेगवेगळ्या डिशेस बनवून चटपटीत खायची लालसा पूर्ण करतात. तुम्हाला सुद्धा मुलांसाठी काहीतरी खास बनवायचे असेल तर ही रेसिपी ट्राय करा. पिझ्झा ढोकळा हा खायला टेस्टी आहे. शिवाय तो झटपट तयार सुद्धा होतो. संध्याकाळचा नाश्ता असो वा सकाळचा नाश्ता तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या पिझ्झा ढोकळाची रेसिपी.
- ३/४ कप रवा
- १/४ कप दही
- २-३ कांदे
- स्वीट कॉर्न
- २ सिमला मिरची बारीक चिरलेली
- मिक्स्ड हर्ब्स
- २ चमचे चिली फ्लेक्स
- २ चमचे पिझ्झा सॉस
- १ क्यूब चीज
- इनो पॅकेट
- ३/४ कप पाणी
- चवीनुसार मीठ
पिझ्झा ढोकळा बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात रवा आणि दही मिक्स करा. ते अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवा. नंतर त्यात पाणी घालून पातळ पीठ करून चांगले फेटून घ्या. त्यात मीठ घालून बारीक चिरलेली सिमला मिरची, स्वीट कॉर्न, बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करा. शेवटी इनो घालून ढवळावे. जेणेकरून पीठ फुगेल. आता एका खोल भांड्याच्या तळाला तेलाने ग्रीस करा आणि त्यात तयार केलेले बॅटर टाका. आता त्याच्या वर पिझ्झा सॉस लावा आणि चीज घालून वाफेवर शिजवा. तुमचा पिझ्झा ढोकळा तयार आहे. कापून गरमा गरम सर्व्ह करा.
संबंधित बातम्या